संपुर्ण नाव- शार्दुल नरेंद्र ठाकूर
जन्मतारिख- 16 ऑक्टोबर, 1991
जन्मस्थळ- पालघर, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई अ, मुंबई इंडियन्स, शेष भारतीय संघ, टाटा स्पोर्ट्स क्लब आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 12 ते 18 ऑक्टोबर, 2018, ठिकाण – हैद्राबाद
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 31 ऑगस्ट, 2017, ठिकाण – कोलंबो
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 21 फेब्रुवारी, 2018, ठिकाण – सेंचूरियन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 254, अर्धशतके- 3
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 27, सर्वोत्तम कामगिरी- 7/61
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 257, अर्धशतके- 1
गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 39, सर्वोत्तम कामगिरी- 4/52
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 25, धावा- 69, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 25, विकेट्स- 33, सर्वोत्तम कामगिरी- 4/27
थोडक्यात माहिती-
-शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा पालघर एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. तो सुरुवातीला क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईपासून 87 किमी दूर असणाऱ्या पालघरवरून दररोज 7 तासांचा प्रवास करून येत असे.
-धवल कुलकर्णी हा मॉडर्न क्रिकेटमधील उभरता गोलंदाज आहे. शार्दुलची गोलंदाजी शैली ही त्याच्या गोलंदाजी शैलीप्रमाणे आहे.
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खालच्या फळीत फलंदाजी करणारा शार्दुलने 9 अर्धशतके केली आहेत. यात त्याच्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या 87 धावांचा समावेश आहे.
-शार्दुलने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विद्यालयाकडून हॅरिश शिल्ड गेममध्ये खेळत असताना, सलग 6 षटकार ठोकले होते. यासह त्याचे एलिट यादीत नाव दाखल झाले होते. यात रवि शास्त्री, सर गॅरी सोबर्स आणि युवराज सिंग यांची नावे आहेत.
-शार्दुलला 2013 साली त्याच्या वजनामुळे मुंबई रणजी ट्रॉफी संघात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याने पुढे 84 किलो वजनावरून 13 किमी वजन कमी केले होते.
-वजन कमी केल्यानंतर 2014-15मध्ये रणजी ट्रॉफीत मुंबईकडून शार्दुलने पुनरागमन केले होते. यावेळी संपूर्ण हंगामात 48 विकेट्स घेत त्याने आपले पुनरागमन गाजवले होते.
-आयपीएल 2014मध्ये शार्दुलला 20 लाख रुपयांना किंग्स इलेव्हन पंजाबने विकत घेतले होते. पण, त्याला पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. 2 हंगाम त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि संघातून बाहेर पडला.
-रणजी ट्रॉफीतील त्याच्या पराक्रमाने त्याला 2014-15सालच्या शेवटी भारत अ कडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने 2015मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकदाश संघाकडूनही क्रिकेट खेळले. या सामन्यात त्याने एका डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.
-2016मध्ये सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शार्दुलने चेतेश्वर पुजाराला बाद करत सर्वोत्तम विकेट घेतली होती. तो सामन्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू ठरला.
-2017मध्ये श्रीलंकाविरुद्ध शार्दुलने वनडेत पदार्पण केले होते. तिथून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. फेब्रुवारी 2018मध्ये शार्दुलने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी20 आणि ऑक्टोबर 2018मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शार्दुलने त्याच्या वाढदिवसाच्या महिन्यावरून 10 नंबरची जर्सी निवडली होती. पण तो जर्सी क्रमांक सचिन तेंडूलकरच्या नावावर असल्याने त्याला 54 नंबरची जर्सी देण्यात आली.
-शार्दुल आता आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो.
– कमी वेळाच शार्दुल भारतीय संघाचा महत्वाचा भाग बनला आहे. तो उत्तम भागीदारी करणारी फलंदाजाची जोडी तोडण्यात महत्वाची भुमिका पार पाडतो.
– शार्दुलने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उत्तम कामगिरी करत 2022च्या टी20 विश्वचषक संघात स्थान मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात ‘या’ 3 संघांचा उठू शकतो बाजार, एकाने दोनदा जिंकलाय विश्वचषक
T20WC2022 | भारतीय संघाने गाठले ब्रिसबेन, पाहा विराट-पंड्याची मस्ती