संपुर्ण नाव- शिव सुंदर दास
जन्मतारिख- 5 नोव्हेंबर, 1977
जन्मस्थळ- भुवनेश्वर, ओडिसा
मुख्य संघ- भारत आणि ओडिसा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 10 ते 13 नोव्हेंबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 5 ऑक्टोबर, 2001
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 1326, शतके- 2
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 39, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-ओडिसामध्ये जन्मलेले शिव सुंदर दास हे भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणारे ओडिसाचे दुसरे क्रिकेटपटू आहेत.
-21व्या शतकाताच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत दास यांनी कसोटीतील सलामीवीरांच्या यादीत स्वत: साठी एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले होते.
-त्यांच्या 3 प्रथम श्रेणी क्रिकेट मोसमातील 2000हून अधिक धावांच्या जोरावर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली होती. त्यांनी 2000मध्ये बांग्लादेशविरुद्ध कसोटीचा पहिला सामना खेळला होता.
-दास यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 23 कसोटी आणि 4 वनडे सामने खेळले होते. तर, त्यांनी कसोटीतील काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.
-2001मध्ये चेन्नईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्त्वपूर्ण अशा 84 धावांची खेळी केली होती. शिवाय दास यांनी कसोटीत 2 शतकेही केली आहेत आणि तीही त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केली आहेत.
-एवढेच नाही तर, दास यांनी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील 6 सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 62.22च्या सरासरीने 560 धावा केल्या होत्या. त्यांना 2001 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता.
-पण, दास यांना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 28.83च्या सरासरीने, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 18.80च्या सरासरीने आणि इंग्लंडविरुद्ध 32.25च्या सरासरीने मिळून केवळ 374 धावा केल्या होत्या.
-2002मधील वेस्ट इंडिज दौऱ्यावरील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ते केवळ 124 धावा करू शकले. त्यामुळे त्यांना कसोटीत पुढे खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांची जागा पुढे विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांनी घेतली.
-वनडेतील त्यांची कारकिर्द कसोटीच्या तुलनेत खूप वाईट होती. त्यांनी जेमतेम 4 वनडे सामने खेळले आणि यातही अवघ्या 39 धावा केल्या.
-अशा प्रकारे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2000 साली आमि शेवट 2002 साली झाला.
-पण जरी दास हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करू शकले नसले. तरी, विरेंद्र सेहवागच्यापुर्वी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीतील सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांची कामगिरी अविस्मरणीय आहे.
-त्यानंतर ते प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचा भाग होते. त्यांच्या 20 वर्षांच्या मोठ्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी 10908 धावा केल्या होत्या.
-त्यांनी ओडिसा संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.