संपुर्ण नाव- सुब्रमण्यम बद्रिनाथ
जन्मतारिख- 30 ऑगस्ट, 1980
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, इंडिया रेड, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, करैकुडी कलाई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 6 ते 9 फेब्रुवारी, 2010, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 20 ऑगस्ट, 2008, ठिकाण – दंबूला
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 4 जून, 2011, ठिकाण – पोर्ट ऑफ स्पेन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 63, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 79, शतके- 0
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 43, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-सुब्रमण्यम बद्रिनाथ याच्यातील क्रिकेट कौशल्य त्याच्या वडिलांनी हेरले. तो विद्यालयीन क्रिकेट खेळत असायचा.
-त्याला त्याचा क्रिकेट आदर्श मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याप्रमाणे भारतीय संघाकडून खेळायचे होते.
-बद्रिनाथ पद्मा शेषाद्री बाल भवन विद्यालयात शिक्षण घेतले आहे. रविश्चंद्रन अश्विन, गुगल सीइओ सुंदर पिछाई, दाक्षिणात्य अभिनेत्री सुप्रिया आणि अभिनेता राम चरण तेजा हेदेखील या शाळेतच शिकले आहेत.
-2004मध्ये दक्षिण विभागाकडून दुलिप ट्रॉफीत इंग्लंड अ ला पराभूत केले होते. यावेळी इंग्लंड अच्या 501 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत ब्रदिनाथने शतकी खेळी केली होती.
-बद्रिनाथ त्या काळात भारतीय संघात पदार्पण करण्यास आले होते, जेव्हा संघात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग असे क्रिकेटपटू असल्याने त्याला संघात संधी मिळाली नाही.
-फेब्रुवारी 2007मध्ये बद्रिनाथने सुनिथीसोबत लग्न केले. टाइम्स ऑफ इडियाच्या एका मुलाखतीत त्याने म्हटले की, माझ्या पत्नीमुळे माझे नशीब खुलले. तिचा मला खूप पाठिंबा मिळाला.
-देशांतर्गत क्रिकेटमधील बद्रिनाथची कामगिरी सातत्यपूर्ण नसल्याने त्याला भारतीय संघात लवकर संधी मिळाली नाही. अखेर सेहवागला दुखापत झाल्याने विराट कोहलीने बद्रिनाथला 2008सालच्या श्रीलंकाविरुद्धच्या वनडेत खेळण्याची संधी दिली.
-यावेळी दंबूलातील वनडे सामन्यात भारतीय संघ 5 बाद 75 धावांवर होता. संघाला जिंकण्यासाठी 68 धावांच गरज होती. तेव्हा 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेला बद्रिनाथ याने महत्त्वाच्या 27 धावा केल्या होत्या. मात्र, पुढे वर्षे त्याला वनडेत खेळण्याची संधी मिळाली नाही.
-फेब्रुवारी 2010मध्ये बद्रिनाथला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. यावेळी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या डावात त्याने 56 धावा केल्या. मात्र भारताने तो सामना गमावला. त्याला भारताकडून अवघे 2 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली.
-2008मध्ये आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून बद्रिनाथने आयपीेलची सुरुवात केली. त्याने 6 हंगाम सीएसकेकडून घालवले. तो सीएसकेच्या 2 विजयाचा भाग होता. तसेच त्याचे संघासाठीचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याने त्याला मिस्टर डिपेंडेबल नाव देण्यात आले.
-तमिळनाडूकडून आपल्या देशांतर्गत कारकिर्दीतील बरेच वर्षे घालवल्यानंतर 2014-15मध्ये तो विर्भ संघात सामील झाला. तसेच 2015च्या आयपीएल हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचाही भाग होता.
-2018मध्ये बद्रिनाथने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.