मराठीत माहिती- क्रिकेटर सुधीर नाईक

संपुर्ण नाव- सुधीर सखाराम नाईक

जन्मतारिख- 21 फेब्रुवारी, 1945

जन्मस्थळ- बॉम्बे ( आताची- मुंबई ), महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत आणि मुंबई

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 4 जुलै ते 8 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 3, धावा- 141, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 2, धावा- 38, शतके- 0

थोडक्यात माहिती- 

-रणजी ट्रॉफी कारकिर्दीत नाईक यांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी 40.10च्या सरासरीने 2687 धावा केल्या. यात त्यांनी 1973-74मध्ये बडोदा संघाविरुद्ध केलेल्या सर्वाधिक नाबाद 200 धावांचा समावेश आहे.

-त्यांनी एकूण 85 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यावेळी त्यांनी 4376 धावा केल्या होत्या. यात 7 शतकांचा समावेश होता.

-रणजीतील त्यांच्या खेळीमुळे त्यांना एजबॅस्टन येथील अंतिम कसोटी सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, लंडनच्या एका दुकानातून पायमोजे चोरी केल्याच्या आरोपावरुन त्यांना कोर्टात नेण्यात आले होते.

-नाईक यांनी 3 कसोटी सामन्यात 141 धावा केल्या होत्या. यात 1 अर्धशतकाचा समावेश आहे.

You might also like