संपुर्ण नाव- सुरेश कुमार रैना
जन्मतारिख- 27 नोव्हेंबर, 1987
जन्मस्थळ- मुरादनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, वरिष्ट भारत, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, शेष भारतीय संघ, उत्तर प्रदेश आणि 16 वर्षाखालील उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 26 ते 30 जुलै, 2010
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 30 जुलै, 2005
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 18, धावा- 768, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 18, विकेट्स- 13, सर्वोत्तम कामगिरी- 2/1
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 226, धावा- 5615, शतके- 5
गोलंदाजी- सामने- 226, विकेट्स- 36, सर्वोत्तम कामगिरी- 3/34
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 78, धावा- 1605, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 78, विकेट्स- 13, सर्वोत्तम कामगिरी- 2/6
थोडक्यात माहिती-
-सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद हे जम्मू काश्मिरमधील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्यांचा दिनेश, नरेश, मुकेश आणि मुलगी रेणू यांच्यानंतर रैना हा सर्वात लहान मुलगा आहे.
-रैनाने वयाच्या 14व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुुरुवात केली होती. तो 16व्या वर्षीच 19 वर्षांखालील उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार बनला.
-कमी वयातील त्याच्या कामगिरीने त्याला बॉर्डर गावसकर स्कॉलरशीप मिळायला सुरुवात झाली, ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षणाची संधी मिळाली.
-2004च्या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकात रैनाला शिखर धवन, रॉबिन सिंग आणि अंबाती रायडू अशा क्रिकेटपटूंसह खेळण्याची संधी मिळाली. त्या विश्वचषकात त्याने 3 अर्धशतके केली. त्यात त्याने स्कॉटलँड विरुद्ध 38 चेंडूत 90 धावांची खेळीही केली.
-2005 साली रैनाने श्रीलंकेविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले. त्यानंतर 5 वर्षांच्या काळात तब्बल 98 वनडे सामने खेळल्यानंतर रैनाने त्याचे कसोटी पदार्पण केले.
-रैनाने त्याच्या वनडे आणि कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पूर्णपणे विरोधाभास कामगिरी केली होती. वनडेत तो श्रीलंकेचा गोलंदाज मुथ्थया मुरलीधरनच्या गोलंदाजीवर शून्यावर पायचीत झाला होता. तर, श्रीलंकेविरुद्धच्याच कसोटी पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.
-कसोटी पदार्पणातील शतकामुळे रैना कसोटी पदार्पणात शतक करणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.
-2010सालच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सामन्यात शतक ठोकत, रैना असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्यानंतर केवळ भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने टी20त शतक ठोकले आहे.
-शिवाय रैनाने ग्रॉस आयलेटमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी20त 60 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 9 चौकारांचा आणि 5 षटकारांचा समावेश होता.
-वयाच्या 23व्या वर्षी रैना भारतीय टी20 संघाचा सर्वात युवा कर्णधार बनला होता. तसेच, क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात भारताचे नेतृत्व करणारा तो दुसरा युवा कर्णधार ठरला होता. त्याच्यापुर्वी माजी क्रिकेटपटू मंसूर अली खान पटौडी हे अव्वल स्थानी विराजमान होते. ते वयाच्या 21व्या वर्षी कर्णधार बनले होते.
-रैनाने जेव्हा त्याचा पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दौरा होता तेव्हा त्याने अशोक डिंडासह संपूर्ण संघासाठी स्वयंपाकही केला होता.
-डावखुरा फलंदाज रैना हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटूही आहे. त्याने वनडेत 5, कसोटी आणि टा20त प्रत्येकी 1 शतक केले आहे. त्याच्यानंतर असा विक्रम करणारा भारतीय फलंदाज रोहित शर्मा आहे.
-रैना हा आयपीएलमध्ये 3000 धावा करणारा पहिलाच क्रिकेटपटू आहे. तसेच त्याने आयपीएलमधील सर्वाधिक झेलही पकडले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकणारा तो भारतातील पहिला आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे.
तर, आयपीएलच्या 7 हंगामात 400पेक्षा धावा करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटूही आहे. त्यामुळे रैनाला मिस्टर आयपीएल असे म्हटले जाते.
-एवढेच नव्हे तर, रैना हा पहिला आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने आयपीएल, सीएलटी20 आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये शतक केले आहे.
-आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा रैना याने 132 सामन्यात 3699 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आयपीएल इतिहासात त्याच्या सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेटचीही नोंद आहे.
-रैनाने त्याच्या सीएसकेच्या रंगानुसार पिवळ्या रंगाची पोर्श बॉक्सर लिमिटेड एडिशन लक्झरी कार विकत घेतली. त्याने 2013ला त्याच्या वडिलांच्या वाढदिवसादिवशी ही कार विकत घेतली.
-2015सालच्या मेरठिया गँगस्टर्स या बॉलिवूड सिनेमासाठी रैनाने तू मिला शब मिला हे गाणे गायले आहे.
-तसेच, त्याने एका टीव्ही रिऍलिटी शेमध्ये सॅक्सोफोन हे वाद्य वाजवले आहे.
-रैनाने भारताकडून खेळताना 3 आणि 48 क्रमांकाची जर्सी वापरली आहे. गमतीचा भाग म्हणजे रैनाच्या आधीपासून भारतीय संघाकडून खेळत असलेला हरभजनही 3 क्रमांची जर्सी वापरतो.
हेही वाचा-
‘सोनू’चा बड्डे: टी20 स्टार Suresh Rainaबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहिती आहेत का?
यशस्वी, ऋतुराज अन् इशानचा भीमपराक्रम, भारताने जागतिक क्रिकेटमध्ये घडवला इतिहास; बनला फक्त पाचवा संघ






