संपुर्ण नाव- सुरिंदर अमरनाथ भारद्वाज
जन्मतारिख- 30 डिसेंबर, 1948
जन्मस्थळ- कानपूर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, दिल्ली, गुजरात आणि पंजाब
फलंदाजीची शैली- डावकरी फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 24 ते 28 जानेवारी, 1976
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 1 ऑक्टोबर, 1978
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 550, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/5
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 100, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-सुरिंदर अमरनाथ यांच्या कुटुंबात क्रिकेटचा वारसा होता. त्यांचे वडील लाला अमरनाथ यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. ते स्वातंत्र्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते. कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी शतक ठोकले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची हिट विकेट घेणारे ते एकमेव गोलंदाज आहेत.
-सुरिंदर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी कसोटी पदार्पणाच्या सामन्यात केली होती. त्यांनी कसोटी पदार्पणात शतक केले होते. त्यानंतर त्यांना कसोटीतच नव्हे तर वनडेतही एकही शतक मारता आले नाही. मात्र, त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत त्यांनी 118 धावांची शानदार खेळी केली होती.
-1975-76मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्यांनी सुनिल गावसकर यांच्यासोबत मिळून भारताच्या पहिल्या डावात 204 धावांची मोठी भागिदारीही रचली होती. यावेळी त्यांनी 124 धावा केल्या होत्या.
-त्यामुळे लाला आणि सुरिंदर ही जगातील पहिली वडिल आणि मुलाची जोडी बनली होती. ज्यांनी कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकले होते. एवढेच नव्हे तर, त्यांनी दोघांनीही कसोटीतील एका शतकानंतर कसोटी आणि वनडेत एकही शतक ठोकले नव्हते.
-सुरिंदर यांच्या कसोटी पदार्पणाच्या 7 वर्षापुर्वी त्यांचे भाऊ मोहिंदर अमरनाथ यांनी कसोटीत पदार्पण केले होेते. तसेच, सुरिंदर यांचा सर्वात लहान भाऊ रजिंदर अमरनाथ हे भारताचे प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. तसेच ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या प्रशिक्षक आहेत.
-सुरिंदर यांचा मुलगा दिग्विजय हे बदुरेलिया स्पोर्ट्स क्लबसाठी (Badureliya Sports Club) क्रिकेट खेळतात.
-1976-77मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलग 4 डावात त्यांनी अनुक्रमे 63, 14, 40 आणि 63 धावा केल्या होत्या. शिवाय त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी सामन्यातही चांगल्या धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली.
-त्यांनी 3 वनडे सामनेही खेळले होते. या 3 सामन्यात मिळून त्यांनी 100 धावा केल्या होत्या. ज्यातील 62 धावा त्यांनी पाकिस्तानविरुद्ध सहिवाल स्टेडियमवर केलेल्या होत्या.
-त्यांनी लॉर्ड्स येथे एमसीसी स्कूल विरुद्ध भारत स्कूल या सामन्यात 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते.
-देशांतर्गत क्रिकेटच्या बाबतीत पाहायचे झाले तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी 40.47च्या सरासरीने 8175 धावा केल्या होत्या.
-सुरिंदर यांनी 1971-72 आणि 1972-73 या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. यावेळेत त्यांनी 55च्या सरासरीने 938 धावा केल्या होत्या. यात 2 द्विशकांचा समावेश होता.
-जरी सुरिंदर हे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकू शकले नसले तरी त्यांनी देशांतर्गत सामन्यात त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यांनी रणजी ट्रॉफीत दिल्ली संघाला 4वेळा अंतिम फेरित नेण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ज्यातील 3 रणजी ट्रॉफी चषक दिल्लीने जिंकले होते.