संपुर्ण नाव- सय्यद आबिद अली
जन्मतारिख- 9 सप्टेंबर, 1941
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर, 1967
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 29, धावा- 1018, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 5, धावा- 93, शतके- 0
थोडक्यात माहिती-
– आबिदने 1959-60 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 212 प्रथम श्रेणी सामन्यांत 28.55 च्या सरासरीने 397 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये त्याने एका डावात 14 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
– आबिदने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी 33 धावांची खेळी केली होती. तसेच पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली होती. याबरोबरच याच कसोटी मालिकेतील सिडनी कसोटीत त्यांनी दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता.
– प्रथम श्रेणी सामन्यात फलंदाजी करताना त्याने 29.30 च्या सरासरीने 8732 धावा केल्या. यामध्ये 13 शतकांचा समावेश होता. याचबरोबर त्याच्या 397 विकेट्ससह त्याने 190 झेल घेतले.
– यामुळे आबिदला कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यात अष्टपैलू कामगिरी केल्याने 1968 साली भारताचा वर्षातील सर्वाेत्तम क्रिकेटपटू घोषित करण्यात आले होते.
– अबिद यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांना त्यांच्यावर आलेले मृत्यूलेख वाचावे लागले होते. कारण त्यांचे भारतीय संघातील संघसहकारी फाहरुख इंजिनियर यांनी चूकून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. परिणामी अबिद यांना वैगक्तिकरित्या या बातमीचे खंडन करावे लागले होते.
– 2008 ला अबिद यांना पुत्रशोक झाला. त्यांचा मुलगा फकरला वयाच्या 33 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. फकर देखील क्लब क्रिकेट खेळायचा. त्याचे सईद किरमाणी यांच्या मुलीशी 2002 ला लग्न झाले होते.