संपुर्ण नाव- तिरुनावुक्करासू कुमारन
जन्मतारिख- 30 डिसेंबर, 1975
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपरस्टार्स, आयसीएल भारत एकादश, तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 14 नोव्हेंबर, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 19, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
थोडक्यात माहिती-
-तिरुनावुक्करासू कुमारन यांना त्यांचे जवळच्या मित्रांनी केन्नी आणि तिरू कुमारन असे नाव दिले होते.
-कुमारन हे चेन्नईतील एमआरएफ पेस फांउडेशनमधील प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांनी डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजी प्रशिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी ऍडलेडमधील ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकॅडमीमध्येही क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.
-1997-98 आणि 1999-2000 या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये कुमारन यांनी 22च्या सरासरीने 78 विकेट्स घेतल्या होत्या. यात इराणी ट्रॉफीतील त्यांच्या 10 विकेट्सचा समावेश होता.
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुमारन यांनी चांगले गोलंदाजी प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले होते. 1999-2000साली त्यांनी क्विन्सलँडविरुद्ध 68 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर, ऑस्ट्रेलिया अध्यक्षयी एकादश संघाविरुद्ध 63 धावा देत 3 विकट्स घेतल्या होत्या.
-त्यांच्या या उल्लेखनीय गोलंदाजी प्ररदर्शनाव्यतिरिक्तही त्यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-कुमारन यांची वनडे कारकिर्द अवघ्या 7 महिन्यांची होती. यात न्यूझीलंडविरुद्धच्या 1999च्या वनडे पदार्पणाच्या सामन्यापासून ते पाकिस्तानविरुद्धच्या 2000च्या शेवटच्या वनडे सामन्यापर्यंत कुमारन यांनी 9 विकेट्स घेतल्या होत्या.
-आयसीएलच्या पहिल्या हंगामात (2007) चेन्नई सुपरस्टार्सकडून खेळताना कुमारन यांनी मुंबई चॅम्पविरुद्ध 21 धावा देत 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यामुळे आयसीएल इतिहासात एका डावात 5 विकेट्स घेणारे ते एकमेव गोलंदाज ठरले होते.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर 2015 साली कुमारन हे अमेरिकेतील दलास येथे स्थायीक झाले. तिथे त्यांची 2015 साली अमेरिकेतील 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षणही केले.