---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर तिरुमलाई श्रीनिवासन

On: मंगळवार, मार्च 24, 2020 6:43 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- तिरुमलाई इचांबडी श्रीनिवासन

जन्मतारिख- 26 ऑक्टोबर, 1950

जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)

मृत्यू- 6 डिसेंबर, 2010

मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे फिरकीपटू गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 13 ते 18 मार्च, 1980, ठिकाण – ऑकलंड

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 डिसेंबर, 1980, ठिकाण – मेलबर्न

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 1, धावा- 48, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 2, धावा- 10, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-सुनिल गावसकर यांच्याप्रमाणेच तिरुमलाई श्रीनिवासन हे भारताचे माजी क्रिकेटपटू एमएल जयसिम्हा यांचे चाहते होते.

-त्यांनी प्रथम श्रेणी कारकिर्दीत 34.18च्या सरासरीने एकूण 3487 धावा केल्या होत्या. यात 5 शतकांचा समावेश होता.

-1977-78मध्ये त्यांनी बेंगलोर येथे दक्षिण विभाग विरुद्ध उत्तर विभाग या दुलिप ट्रॉफी सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. यावेळी त्यांनी दक्षिण विभाग संघाकडून 112 धावा करण्याचा पराक्रम केला होता.

-तसेच, 1980-81च्या देवधर ट्रॉफी अंतिम सामन्यात दक्षिण विभागाकडून त्यांनी 129 धावांची मोठी खेळी केली होती.

-शिवाय श्रीनिवासन यांच्या नवी दिल्ली येथील इराणी ट्रॉफीतील शतकी खेळीने त्यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी तर ऑस्ट्रेलियाविरद्ध वनडे सामना खेळला होता.

-श्रीनिवासन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळला होता. ऑकलंड येथील न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्यांनी फलंदाजी करताना 29 आणि 19 धावा केल्या होत्या.

-त्यांची वनडेतील कामगिरी उल्लेखनीय नव्हती.

-श्रीनिवासन हे फिरकीपटू गोलंदाज होते. त्यांनी यॉर्कशायर लीगमध्ये वूडहाउस क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळले होते. तर, नव्याने निर्माण झालेल्या साउथ वेल्स देशात त्यांनी ग्रेड क्रिकेट खेळले होते.

-ब्रेन कॅन्सरमुळे त्यांचे डिसेंबर 2010मध्ये निधन झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---