संपुर्ण नाव- वरून रेमंड अरॉन
जन्मतारिख- 29 ऑक्टोबर, 1989
जन्मस्थळ- सिंगभूम, बिहार (आताचे झारखंड)
मुख्य संघ- भारत, ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सलन्स, ऑस्ट्रेलियन इन्सटिट्यूट ऑफ स्पोर्ट, दिल्ली, दिल्ली डेअरडेविल्स, दुर्हम, भारत अ, भारत ब, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इडिया रेड, झारखंड, 19 वर्षांखालील झारखंड संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मद्रास रबर फॅक्टरी, राजस्थान रॉयल्स, शेष भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 22 ते 26 नोव्हेंबर, 2011, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 23 ऑक्टोबर, 2011, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 35, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 18, सर्वोत्तम कामगिरी- 3/97
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 11, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
थोडक्यात माहिती-
-वरूण अरॉन हा वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज अँन्डी रॉबर्ट्स यांना आपला आदर्श मानतो. तो रॉबर्टच्या वेगवान गोलंदाजीला आकर्षित झाला आणि आजही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. अरॉन नेहमी दर ताशी 90 मैलच्या वेगाने गोलंदाजी करत असतो, ज्यामुळे त्याला कित्येकदा दुखापती होत असतात.
-वयाच्या 15व्या वर्षापासून अरॉन हा चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनचा भाग होता. त्याने पहिल्याच वर्षात तिथे 19 वर्षांखालील झारखंड संघात स्थान मिळवले. तर लवकरच तो पुर्व विभाग आणि 19 वर्षांखालील भारतीय कॅम्पचाही भाग बनला.
-2011मध्ये झारखंड संघाकडून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 153 किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी अरॉन हा भारतातील सर्वात गोलंदाज ठरला.
-2008मध्ये अरॉन हा ऑस्ट्रेलियाला गेला होता. तिथे तो ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सलन्स संघाकडून खेळला. त्यावेळी संघात डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड आणि उस्मान ख्वाजा असे क्रिकेटपटू होते.
-इंग्लंडविरुद्ध 2011मध्ये अरॉनने वनडेतून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यावेळी त्याने सर्वप्रथम टीम ब्रेसननला बाद केले. तर, अलेस्टर कूक आणि मारलॉन सॅम्यूल्स यांनाही त्याने बाद केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
-अरॉनला शाहरूक खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल फ्रंचायझीने विकत घेतले होते. पण 2011म्ये त्याने दिल्ली डेअरडेविल्सकडून आपले आयपीएल पदार्पण केले. तो 2016ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत होता.
-2014च्या काउंटी चॅम्पियनशीपमधील दुर्हम संघामध्ये अरॉनची निवड झाली. यावेळी तो माजी इंग्लंड कर्णधार पॉव कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली 2 सामने खेळला.
-2015च्या विजय हजारे ट्रॉफी हंगामात अरॉन हा झारखंड संघाचा क्रणधार होता. त्या सामन्यात एमएस धोनी हा संघाचा यष्टीरक्षक होता.
-अरॉनचे काही वेगवान गोलंदाजी विक्रम
2010-11च्या रणजी ट्रॉफी हंगामात अरॉनने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्याचा गोलंदाजी वेग हा 153.4 किमी दर ताशी एतका होता.
श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने 152.4 किमी तर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. यासह तो त्या सामन्यातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरला होता.
2015च्या आयपीेलमध्ये अरॉनने सर्वात वेगाने चेंडू टाकत वेगवान गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी त्याने 150.2 किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता.