संपुर्ण नाव- वाक्कदाई बिक्शेश्वरन चंद्रशेखर
जन्मतारिख- 21 ऑगस्ट, 1961
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)
मृत्यू- 15 ऑगस्ट, 2019
मुख्य संघ- भारत, गोवा आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 10 डिसेंबर, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 88, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
थोडक्यात माहिती-
-चंद्रशेखर हे देशांतर्गत क्रिकेटमधील फटकेबाज फलंदाज होते. त्यांची आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांची फलंदाजी शैली बऱ्याच प्रमाणात सारखी होती.
-तमिळनाडू संघाकडून 9 हंगाम खेळल्यानंतर पुढील 2 हंगाम चंद्रशेखर यांनी गोवा संघाकडून खेळले.
-प्रथम श्रेणी कारकिर्दीतील त्यांच्या सर्वोत्कृष्ट धावा (237) त्यांनी गोवा संघाकडून खेळताना केल्या होत्या.
-क्रिकेटपटूंची इराणी ट्रॉफीतील कामगिरी महत्त्वाची असते. यामुळे त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी उपलब्ध होण्यास मदत होते. 1988साली चंद्रशेखर यांच्या 119 धावांच्या मदतीने तमिळनाडू संघाला इराणी ट्रॉफीचे विजेतेपद मिळण्याचा मान मिळाला होता. त्यांनी हे शतक अवघ्या 56 चेंडूत केल्याने ते प्रथम श्रेणीत सर्वात वेगवान शतक करणारे भारतीय क्रिकेटपटू ठरले होते.
-इराणी ट्रॉफीतील त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी त्यांनी 7 वनडे सामन्यात 12.57च्या सरासरीने केवळ 88 धावा केल्या होत्या.
-क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 1997 साली चंद्रशेखर यांनी व्हिबी क्रिकेट अकॅडमीची सुरुवात केली. याचे उद्घाटन ऑस्टेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांनी केले होते.
-शिवाय चंद्रशेखर हे राज्य आणि राष्ट्रीय दर्जाचे निवडकर्ताही होते. 2001 ते 2007 या काळात ते राज्य निवड समिताचे अध्यक्ष होते. तर, 2004 ते 2006 या काळात ते राष्ट्रीय निवडकर्ता होते.
-2012साली ते तमिळनाडू संघाचे प्रशिक्षक होते. पण, पुढील हंगामात त्यांना या पदावरून काढून टाकले गेले.
-त्यांनी टीव्ही समालोचन देखील केले आहे. 2015 साली त्यांनी आयपीएलचे तमिळ भाषेत समालोचन केले आहे.
-हृदयाचा झटका आल्याने त्यांचे 2019 साली निधन झाले.