संपुर्ण नाव- राघवेंद्रराव विजय भारद्वाज
जन्मतारिख- 15 ऑगस्ट, 1975
जन्मस्थळ- बंगलोर, कर्नाटक
मुख्य संघ- भारत आणि कर्नाटक
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 10 ते 14 ऑक्टोबर, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 26 सप्टेंबर, 1999
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 28, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/26
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 136, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 16, सर्वोत्तम कामगिरी- 3/34
थोडक्यात माहिती-
-विजय भारद्वाज हे त्यांच्या चष्मासोबत त्यांच्या स्कॉलर लूकसाठी प्रसिद्ध होते. त्यांना आर विजय भारद्वाज या नावानेही ओळखले जाते.
-त्यांच्या पत्नीचे नाव शालू भारद्वाज आहे.
-ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही चांगले होते. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेवढी विशेष कामगिरी करता आली नव्हती.
-1990च्या दशकात 3 रणजी ट्रॉफी हंगामात भारद्वाज यांनी कर्नाटक संघाचे नेतृत्व करत तिन्ही वेळेला विजय मिळवला होता.
-1998-99च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 81.27च्या सरासरीने 1463 धावा केल्या होत्या. यात त्यांच्या 4 शतकांचा समावेश होता. तर त्यांनी 24.04च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या होत्या.
-तसेच 1998च्या रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण हंगामात 1280 धावा केल्या होत्या. यामुळे भारद्वाज हे एका रणजी ट्रॉफी हंगामात 1200पेक्षा जास्त धावा करणारे पहिलेच फलंदाज ठरले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती.
-1999 ते 2000च्या नैरोबी येथील एलजी चषकातून वनडेत पदार्पण केले होते. यावेळी 10 विकेट्स घेत त्यांनी मालिकावीर पुरस्कार मिळवला होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर भारद्वाज हे राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे तिसऱ्या स्तराचे प्रशिक्षक होते.
-तसेच आयपीएलच्या सुरुवातीच्या 3 हंगामातही ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे सहकारी प्रशिक्षक होते.
-तसेच त्यांनी ओमन क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपद सांभाळले आहे.