संपुर्ण नाव- विजय दहिया
जन्मतारिख- 10 मे, 1973
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत आणि दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख -18 ते 22 नोव्हेंबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 3 ऑक्टोबर, 2000
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 2, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 19, धावा- 216, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-3 ऑक्टोबर 2000 साली विजय दहिया, युवराज सिंग आणि झहिर खान यांनी एकाच सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. पुढे युवराज आणि झहीरने त्यांची क्रिकेट कारकिर्द चांगली झळकवली. मात्र दहिया यांना विशेष कामगिरी करता आली नाही.
-2011च्या यशस्वी विश्वचषकात युवराज आणि झहीर हे भारतीय संघाचा भाग होते. पण, त्यांच्यासह वनडेत पदार्पण करणारे दहिया यांना मात्र विश्वचषकात संधी मिळाली नाही.
-ते उजव्या हाताचे फलंदाज आणि यष्टीरक्षकही होते. पण, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्हीतही आपली छाप उमटवता आली नाही. त्यांनी 19 वनडे सामन्यात यष्टीमागे अवघे 24 विकेट्स घेतले होते.
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र दहिया यांनी उल्लेखनीय खेळी केली होती. त्यांनी प्रथम श्रेणीत 34च्या सरासरीने 3532 धावा केल्या होत्या. तर यष्टीमागे 216 विकेट्स घेतल्या होत्या.
-शिवाय 1999-2000 साली त्यांच्या उत्तर विभाग संघाने दुलिप आणि देवधर ट्रॉफीच्या चषकावरही आपले नाव कोरले होते.
-2006-07 साली दहिया यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि पुढे ते प्रशिक्षण क्षेत्राकडे वळले.
-त्यांनी पुढील हंगामात (2007-08) दिल्ली संघाचे प्रशिक्षण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम गंभीरच्या दिल्ली संघाने त्यासालची रणजी ट्रॉफीही जिंकली होती. 1991-92 पासून दिल्लीचे ते पहिलेच विजेतेपद होते.
-एवढेच नव्हे तर, दहिया हे आयपीएलमधील संघ कोलकात नाईट राइडर्सचे सहाय्यक प्रशिक्षकही होते.