संपुर्ण नाव- रंगनाथ विनय कुमार
जन्मतारिख- 12 फेब्रुवारी, 1984
जन्मस्थळ- दावनगिरी, कर्नाटक
मुख्य संघ- भारत, भारत अ, कर्नाटक, कोची टस्कर्स केरळ, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दक्षिण विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 13 ते 15 जानेवारी, 2012, ठिकाण – पर्थ
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 28 मे, 2010, ठिकाण – बुलवायो
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका , तारिख – 11 मे, 2010, ठिकाण – ग्रॉस आयलेट
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 11, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/73
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 31, धावा- 86, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 31, विकेट्स- 38, सर्वोत्तम कामगिरी- 4/30
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 2, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
थोडक्यात माहिती-
-विनय कुमारचे वडील हे रिक्षा चालक होते. त्यांनी खूप मेहनतीने विनयला क्रिकेटपटू बनवले. 2 डिसेंबर 2013मध्ये त्याने रिचा सिंग हिच्याशी लग्न केले.
-वयाच्या 13व्या वर्षी एलएम प्रकाश यांनी विनयमधील फलंदाजी कौशल्याला हेरले. पुढे ते त्याचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. तसेच त्यांनी विनयला क्रिकेटींग कीटही घेऊन दिले होते.
-2004मध्ये बंगालविरुद्धच्या रणजी ट्रॉफीतून विनयने आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी त्याने सौरव गांगुली आणि रोहन गावसकर यांची विकेट घेतली. तो सामना कर्नाटकने 116 धावांनी गमावला होता. तर, तो संपूर्ण हंगाम विनयने 28 विकेट्स घेत संपवला होता.
-2007-08च्या संपूर्ण रणजी हंगामात 40 विकेट्स घेत विनय एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला होता.
-2009-10मध्ये तो प्रथम श्रेणीतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. यावेळी त्याने 53 विकेट्स घेतल्या होत्या.
-तसेच 2010मध्ये विजय हजारे ट्रॉफीतील 12, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील 19 अशा त्याच्या विकेट्सच्या आकडेवारी होत्या. यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2010मधील आयसीसी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती.
-तो 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. विनयला 2011मध्ये कोची टस्कर्स केरळने युएसडी 475000ला विकत घेतले होते. तर, पुढे 2 हंगाम त्याला युएसडी 1 मिलीयनच्या किमतीला आयसीबीमध्ये स्थान मिळाले होते. तर, 2014मध्ये त्याला 2.8 कोटींना कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश मिळाला होता. शेवटी 2015मध्ये तो मुंबईइंडियन्समध्ये सहभागी झाला.
-2012मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना विनयने 16 विकेट्स घेतल्या होत्या. यासह तो संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा क्रिकेटपटू होता.
-वेंकटेश प्रसाद यांच्याप्रमाणे स्विंग आणि लेग कटर्स गोलंदाजी करण्याची शैली नृविनयला अवगत होती. प्रसा आण जवागल श्रीनाथ हे त्याचे आदर्श आहेत.
-2012-13मध्ये विनयची कर्नाटक रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. तो पुढे 2013-14 आणि 2014-15मध्येही संघाचा कर्णधार होता. यावेळी त्याने अनुक्रमे 39 आणि 55 विकेट्स घेतल्या होत्या.
-विनयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी 2012मध्ये कसोटी पदार्पण केले होते. वरूण अरॉनला दुखापत झाल्याने त्याला ही संधी मिळाली होती. तो त्याचा पहिला आणि शेवटचा कसोटी सामना होता.