संपुर्ण नाव- विराट कोहली
जन्मतारिख- 5 नोव्हेंबर, 1988
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, उत्तर विभाग, ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सुरी
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 20 ते 23 जून, 2011, ठिकाण – किंगस्टन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 18 ऑगस्ट, 2008, ठिकाण – दंबूला
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 12 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 86, धावा- 7240, शतके- 27
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 248, धावा- 11867, शतके- 43
गोलंदाजी- सामने- 248, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 1/15
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 82, धावा- 2794, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 82, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 1/13
थोडक्यात माहिती-
-विराट कोहलीला त्याचे संघ सहकारी चिकू या टोपणनावाने बोलावतात.
-विराटने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी 2006मध्ये दिल्ली विरुद्ध कर्नाटक रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. यावेळी त्याने 90 धावा केल्या होत्या.
-2008मध्ये विराटने 19 वर्षांखालील विश्वचषक संघाचे नेतृत्व केले होते. तसेच संघाला विजयही मिळवून दिला होता.
-2009मध्ये त्याने ऑस्ट्रेलियातील इमर्जिंग प्लेयर्स मालिकेत 7 सामन्यात 2 शतकांसह 398 धावा केल्या होत्या. यासह तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला होता.
-विराट हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याने आयपीएल 2008पासून ते आतापर्यंत केवळ एका संघाकडून क्रिकेट खेळले आहे. तो आतापर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल फ्रंचायझीचा भाग आहे.
-विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने 117 सामन्यात 5412 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत सुरेश रैना, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांचा क्रमांक लागतो.
-दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या जोहान्सबर्ग येथील कसोटी सामन्यात एमएस धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने विराटने त्यावेळी यष्टीरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. तसेच ढाका येथील बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीतही त्याने काही वेळासाठी यष्टीरक्षण केले होते.
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 259 वनडे डावात 10000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. त्याचा हा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडला आहे. विराटने 205 डावात 10000 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो वनडेत सर्वात जलद दहा हजार धावा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरला.
-विराटने 248 वनडे सामन्यात 43 शतके केली आहेत. तर सचिनने 463 वनडे सामन्यात 49 शतके केली होती. भविष्यात विराट वनडेतील सचिनच्या शतकांचा विक्रम मोडू शकतो.
-विराटच्या नावावर वनडेत सर्वात जलद 1000,3000,4000 आणि 5000 धावा करण्याचा विक्रम आहे.
-तसेच विराट हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याने विश्वचषक पदार्पण सामन्यात शतकी खेळी केली होती. 2011मध्ये बांग्लादेशविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याने 83 चेंडूत एका डावातच 100 धावा केल्या होत्या.
-2012मध्ये विराटचे 10 सर्वोत्कृष्ठ पोषाख घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या यादीत नाव आले. तसेच स्पोर्ट्स प्रोने विराटला जगातील 13वा मार्केटेबल खेळाडू म्हणून निवडले.
-2012च्या आशिया चषकात विराटने पाकिस्तानविरुद्ध 148 चेंडूत 183 धावा केल्या होत्या. ब्रायन लारानंतर पाकिस्तानविरुद्ध एका डावात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. लाराने 156 धावा केल्या होत्या.
-2013मध्ये जयपूरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत विराटने सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता. त्याने अवघ्या 52 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.
-2015मध्ये भारताच्या कर्णधारपदाची धुरा धोनीपासून विराटला देण्यात आली होती.
-विराट हा एकमेव असा आशियाई कर्णधार आहे, ज्याने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2019मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली होती. तर त्यापुर्वी 2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये भारताने प्रत्येकी एक एक कसोटी मालिका जिंकली होती.
-2018साली दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत 500 हून अधिक धावा करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्याने यावेळी 6 सामन्यात 558 धावा करत भारताला 5-1ने ती मालिका जिंकून दिली होती.
-विराटने 11 डिसेंबर, 2017ला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले.