संपुर्ण नाव- विवेक राजदान
जन्मतारिख- 25 ऑगस्ट, 1969
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख -23 ते 28 नोव्हेंबर, 1989
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 18 डिसेंबर, 1989
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 6, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 5/79
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 23, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/37
थोडक्यात माहिती-
-विवेक राजदान हे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणारे जम्मू आणि काश्मिरचे पहिले क्रिकेटपटू होते.
-ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेनिस लिली आणि भारताचे माजी क्रिकेटपटू तिरुमलाई शेखर यांच्या मार्गदर्शनाखालील विवेक हे चेन्नई येथील एमआरएफ फांउडेशनचे पहिले प्रशिक्षणार्थी होते.
– प्रथम श्रेणीत अवघे 2 सामने (1 दुलिप ट्रॉफी व 1 इराणी ट्रॉफी) खेळताच 1989 साली विवेक यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते.
-विवेक यांनी सियालकोट येथील त्यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्पेल टाकत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. पण, पुढे दुर्दैवाने त्यांना कसोटीत खेळायची संधी मिळाली नव्हती.
-त्याच साली 18 डिसेंबर मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, विवेक आणि सलील अंकोला यांनी पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. यावेळी विवेक हे 20 वर्षाचे, अंकोला हे 21 वर्षाचे तर सचिन हे 16 वर्षाचे होते.
– विवेक यांना या सामन्यात विकेट घेता आली नव्हती, तसेच ते फलंदाजीतही विशेष कामगिरी करू शकले नव्हते. पुढे त्यांनी अवघे 2 वनडे सामने खेळले आणि वनडे कारकिर्दीच्या 3 सामन्यात एकूण 23 धावा आणि 1 विकेट घेतली.
-यानंतर विवेक यांची न्यूझीलंड दौऱ्यावर निवड झाली होती. मात्र त्यांना संघात खेळण्याची संधी न मिळाल्याने 1990 साली त्यांच्या आंतरारष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला.
-जरी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विवेक चमकू शकले नसले तरी, त्यांची 1991-92च्या रणजी ट्रॉफी हंगामातील कामगिरी विशेष होती.
-यावेळी हंगामात तमिळनाडू विरुद्धच्या अंतिम सामन्यातही विवेक यांनी 93 धावांची खेळी केली होती. तर संपूर्ण हंगामात 23 विकेट्स घेत दिल्ली संघाला रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
-त्यानंतर केवळ 2 रणजी ट्रॉफी हंगाम खेळताच त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीचाही शेवट झाला.
-निवृत्तीनंतर काही काळ विवेक हे समालोचक म्हणून काम करत होते.
-तसेच, त्यांनी दिल्ली संघाचेही काही काळ प्रशिक्षण केले होते.