संपुर्ण नाव- वासिम जाफर
जन्मतारिख- 16 फेब्रुवारी, 1978
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, अबहानी लिमिटेड, भारत अ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, विदर्भ आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 24 ते 26 फेब्रुवारी, 2000, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 22 नोव्बेंबर, 2006, ठिकाण – दुर्बन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 31, धावा- 1944, शतके- 5
गोलंदाजी- सामने- 31, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/18
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 10, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-वासिम जाफरचा पुतण्या अरमान जाफर हा देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याची कारकिर्द जास्त विशेष राहिली नाही.
-जाफरने वयाच्या 15व्या वर्षी शालेय स्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की, त्याची फलंदाजी शैली ही भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्याप्रमाणे आहे.
-वयाच्या 16व्या वर्षी मुंबईकडून रणी ट्रॉफीत पदार्पण करणाऱ्या जाफरने त्याच्या दुसऱ्या सामन्यातच त्रिशतक ठोकले होते. अत्यंत युवा वयात 314 धावा करत त्याने सुलक्षण कुलकर्णी यांच्यासह 459 धावांची भागीदारी केली होती. यासह सलामीला फलंदाजी करत 400पेक्षा जास्त धावा करणारे ती पहिलीच जोडी ठरली होती.
-देशांतर्गत क्रिकेटमधील 3-4 वर्षांनंतरच्या कामगिरीने लगेच जाफरला भारतीय संघात प्रवेश मिळाला होता. फेब्रुवारी 2000मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले होते. मात्र या सामन्यातील त्याच्या नकोश्या खेळीने त्याला पुढील कसोटी सामना खेळण्यासाठी 2 वर्षे वाट पाहावी लागली.
-2006 साली एँटिग्वा येथील दबावाच्या आणि प्रयत्नशील परिस्थितीत जाफरने अत्यंत शांततेने 212 धावांची मोठी खेळी केली होती. तरीही, वेस्ट इंडिजविरुद्धचा हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
-2008-09च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 1260 धावा केल्या होत्या. यासह तो एका हंगामात सर्वोत्कृष्ट धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता.
-वयाच्या 13व्या वर्षी 2013मध्ये जाफर इंग्लंडला एलडीसीसी लीगमध्ये आयन्सडेल सीसीचे प्रातिनिधित्तव करण्यास गेला होता. त्याने काउंटी क्रिकेट जरी खेळले नसेल तरी इंग्लंडमध्ये आपली छाप पाडली होती. त्याने एलडीसीसी लीगमध्ये 97च्या सरासरीने 153 धावा केल्या होत्या.
-2014मध्ये अचानक गुडघ्याला झालेल्या दुखापतीने जाफरला इंग्लंडमधून भारतात परत यावे लागले होते. भारतात येऊन त्याने उपचार केला आणि पुढील हंगामात रणजी ट्रॉफी खेळण्याच्या अपेक्षेने भारतात राहिला.
-इंग्लंडवरून परत आल्यानंतर जाफरने मुंबई संघ सोडून विदर्भात प्रवेश केला. त्याने 18 वर्षे मुंबईकडून रणजी ट्रॉफीसाठी दिली होती.
-डिसेंबर 2011मध्ये रणजी ट्रॉफी संघसहकारी अमोल मुझुमदारला मागे टाकत रणजी ट्रॉफीत सर्वोत्कृष्ट धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. विशेष म्हणजे 1996मध्ये ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती, तिथेच त्याने हे यश पूर्ण केले होते.
-222 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 51 शतकांसह 16842 धावा केल्या. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेटमधील बाप खेळाडू म्हणून ओळखले जाते.
-तसेच रणजी ट्रॉफीत 18 वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक शतके(57) ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच त्याने 2 द्विशतके आणि 2 त्रिशतकेही केली होती.
-आयपीएलच्या पहिल्या हंगामात तजाफर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. यावेळी त्याच्या अयशस्वी कामगिरीने त्याला टी20त खेळण्याची संधी मिळाली नाही.
-मार्च 2020मध्ये जाफरने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे.