मागच्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत होते. रविवारी (28 मे) दिल्ली पोलिसांकडून हे आंदोलन उठवण्यात आले. एकीकडे भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन सुरू अशताना दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच पार्श्वभूमीवर बजरंग पुनियाने माहिती दिली की, तो आपले ऑलिम्पिक मेडल गंगेत वाहणार आहे आणि इंडिया गेटवर अमरण उपोषणाला बसणार आहेत.
बजरंग पुनियाने आपल्या ट्वीटर खात्यावरून याबाबत सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. अनेक कुस्तीपटूंवर एफआयआर देखील दाखल केल्या गेल्या आहेत, असे बजरंग पुनिया या पोस्टमध्ये म्हटला आहे. सध्या दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे मंगळवारी (30 मे) देशासाठी जिंकलेली सर्व पदके कुस्तीपटू हरद्वार येथून गंगेत सोडून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
आपल्या पोस्टमध्ये बजरंग पुनियाने लिहिले की, “28 मे रोजी जे झाले, तर आपण सर्वांनी पाहिलेच आहे. पोलिसांनी आम्हा सर्वांसोबत कसा व्यावहार केला, आम्हाला कशा पद्धतीने ताब्यात घेतले गेले. पोलीस आणि व्यवस्था आमच्यासोबत आरोपींप्रमाणे वागणूक करत आहे. असे वाटत आहे की, आमज्या गळ्यात सजलेली या पदकांना काहीच अर्थ नाहीत. ही पदके परत करण्याचा विचार केल्यानंतर आम्हाला मृत्यूशी बरोबरी केल्याप्रमाणे वाटते. पण आपल्या आत्मसन्मानासोबत तडजोड करूनही काय जगायचे.”
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 30, 2023
“ही पदके आमचे प्राण आणि आत्मा आहेत. हे गंगेत वाहिल्यानंतर आमच्या जगण्याला असाही काही अर्थ राहणार नाहीये. त्यामुळेच आम्ही इंडिया गेटवर अमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट आपल्या शहिदांची जागा आहे, ज्यांनी देशासाठी आपला देह त्यागला आहे. आज (मंगळवार, 30 मे) सायंकाळी सहा वाजता आम्ही हरिद्वारमध्ये आपली पदके गंगेत वाहणार आहोत.”
दरम्यान, भारतीय कृस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजब खासदार बृजभूषण सिंग यांच्याविरोधात या सर्वा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या तक्रारी आहेत. काही महिला कुस्तीकडूंनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोपही केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, कुस्तीपटूंच्या मते बृजभूषण सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता असल्यामुळे त्याच्याविरोधात अपेक्षित पद्धतीने कारवाई होताना दिसत नाहीये. (Protesting wrestlers will leave their Olympic medals in Ganga river )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राचे ‘6’ मावळे ज्यांनी गाजवलाय आयपीएलचा सोळावा हंगाम, चौघांनी तर ट्रॉफीच जिंकलीये
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ