पाकिस्तान सुपर लीग अंतिम टप्प्यात आली असून काल इलिमीनिटर दोनचा सामना पार पडला. हा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला.
पेशावर झाल्मी विरूद्ध कराची किंग्ज अशा झालेल्या या सामन्यात पेशावर झाल्मीने १३ धावांनी विजय मिळवला. हा सामना रात्री उशीरा सुरू झाला. त्यामूळे तो १६ षटकांचा खेळवण्यात आला.
हा सामना पावसामुळे वाया जावू नये म्हणून मैदानावरील स्टाफबरोबर एक हेलिकॉप्टर खास पीच वाळवण्यासाठी मागवण्यात आले होते. लाहोर शहरातील गद्दापी स्टेडीअमवर हे दृश्य चाहत्यांना पहायला मिळाले.
यावेळी चाहत्यांची निराशा होवू नये म्हणून असा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी दुसरे एक हेलिकॉप्टर मैदानात आले. ते पाकिस्तान लष्कराचे होते.
Helicopter here at the Gaddafi Stadium to make the field dry. #HBLPSL pic.twitter.com/JUibYzrIyx
— Mazher Arshad (@MazherArshad) March 21, 2018
२५ मार्च २०१८ रोजी पाकिस्तान सुपर लीगची फायनल होणार आहे. कराची येथे हा सामना पेशावर झाल्मी विरूद्ध इस्लामाबाद यूनायटेड या संघात होणार आहे.
Another chopper has come in. This one from the army. pic.twitter.com/xPFnwVJNyp
— Mazher Arshad (@MazherArshad) March 21, 2018
यापुर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २०१७मध्ये झालेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात हैद्राबाद येथे मैदान सुकवण्यासाठी फॅन लावण्यात आले आहेत.
PCB leaving no stone unturned to have the eliminator to tonight. Using a chopper to dry the field. That’s why the PSL hashtag is Dil Se Jaan Laga De. #KKvPZ pic.twitter.com/D257drxUSN
— Mazher Arshad (@MazherArshad) March 21, 2018