पाकिस्तान सुपर लीगमधील अनेक संघ मालक हे परदेशी खेळाडंच्या एकंदरीत वर्तनामुळे नाराज आहेत. पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंडीयन प्रिमीयर लीगपुर्वी दुखापत होवू नये म्हणून अनेक परदेशी खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात भागच घेत नसल्याच बोललं जात आहे.
काही सुत्रांच्या मते तर काही परदेशी खेळाडू दुखापतीच कारण देत ऐनवेळी सामन्यातून माघार घेत आहेत.
जोफ्रा आर्चर या खेळाडूने तर क्वेट्टा ग्लडीअटरकडून अगदी महत्वाचा सामना सुरू होण्यापुर्वी माघार घेतली होती. यामुळे संघ व्यवस्थापन, संघातील अन्य खेळाडू अाणि संघ मालक चांगलेच नाराज झाले होते.
जोफ्रा आर्चरला राजस्तान राॅयल्स संघाने ८००००० डाॅलरला संघात घेतले असून तो पहिल्यांदाच इंडीयन प्रिमीयर लीगमध्ये खेळत आहे.
जगात सध्या अनेक क्रिकेट लीग सुरू झाल्या असून खेळाडू तरीही इंडीयन प्रिमीयर लीगला प्राधान्य देताना दिसत आहेत याचे कारण म्हणजे जर आयपीएलला चांगली कामगिरी केली तर मिळणारा पैसा आणि खेळाडूंना मिळणारी प्रसिद्दी असल्याचे बोलले जात आहे.