भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघ जाहीर केल्यानंतर सर्वच क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण भारताचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन देखील दुखापतीमुळे सामन्यात खेळू शकले नाहीत. त्याआधीच दुखापतीमुळे रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी या कसोटीतून बाहेर पडले होते. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाला तब्बल चार बदल करावे लागले.
चौथ्या कसोटीसाठी भारताने मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकुर,वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजनचा संघात समावेश केला आहे. भारताच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील संघात व शेवटच्या सामन्यातील संघात तब्बल 8 बदल झालेले आहेत.
ॲडलेड येथे झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यातील भारतीय संघात पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहरी, वृद्धिमान सहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव व जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. या खेळाडूंपैकी भारताच्या चौथ्या कसोटी सामन्यात केवळ मयंक अग्रवाल ,चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेच खेळत आहेत. त्यातही मंयंकला तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चारही सामन्यात भारतीय संघात कायम रहाणारे २ खेळाडू आहेत, ते म्हणजे पुजारा आणि रहाणे. या दोघांनीच चारही कसोटी सामने खेळले आहेत.
पण असे असले तरी विराट कोहलीची पालकत्व रजा व इतक्या सर्व खेळाडूंना झालेली दुखापत देखील भारताचा आत्मविश्वास कमी करू शकली नाही.पहिल्या सामन्यात लाजिरवाना पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने ज्या प्रकारे उत्तम कामगिरी केली त्याचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत असून भारतीय क्रिकेटप्रेमींना शेवटच्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघ – पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज,
तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघ – रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत(यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
चौथ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघ – शुभमन गिल, रोहित शर्मा(उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, मयंक अग्रवाल, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास? जाणून घ्या त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनसाठी भारताविरुद्धची ब्रिस्बेन कसोटी आहे खुपच खास, जाणून घ्या कारण