---Advertisement---

चार सामन्यात चमकलेला पुजारा पाचव्या सामन्यात मात्र फ्लॉप

On: गुरूवार, मे 31, 2018 6:56 PM
---Advertisement---

रॉयल लंडन एकदिवसीय चषक क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने डर्बीशायरवर दोन विकेटने विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना उशीरा सुरु झाला.

प्रत्येकी २४ षटकांच्या झालेल्या या सामन्यात यॉर्कशायरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डर्बीशायरकडून सलामीला आलेल्या बेन स्लेटरने ८२ चेंडूत १०९ धावांची नाबाद तडाखेबंद खेळी केली. डर्बीशायरने २४ षटकात सहा गडी गमावत १८९ धावा फलकावर लावल्या. यॉर्कशायरकडून डेव्हिड विलीने ४७ धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले.

आता फलंदाजी करणाऱ्या यॉर्कशायरने सलामीवीर टॉम कोहलर ८१, पुजारा १४ आणि दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यु फिशरने ८ चेंडुत २४ धावांची ‘फिनीशींग’ खेळी केली व संघाला १ चेंडू व २ विकेट शिल्लक असताना विजय मिळवून दिला. डर्बीशायरकडून गोलंदाजीत रवी रामपॉलने ४८ धावा देऊन पाच गडी बाद केले.

पुजारा या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. फटकेबाजीच्या नादात तो लवकर बाद झाला. त्याने तीन चौकारांच्या सहाय्याने १४ धावा केल्या. यॉर्कशायर या विजयासह नॉर्थ ग्रुप मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचले तर पराभवामुळे डर्बीशायर चौथ्या स्थानावर घसरले. यॉर्कशायरचा पुढील सामना मंगळवारी मॅंचेस्टरमध्ये लॅंकशायरविरुध्द होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment