चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखले जाते. भारतीय संघाची भिंत म्हणून राहुल द्रविडने बरेच वर्ष धुरा वाहिली. ज्या क्रमांकावर राहुल द्रविड खेळत असे त्याच क्रमांकावर सध्या पुजारा खेळतो.
तरीही पुजारा आणि द्रविडमध्ये असं एक खास साम्य आहे जे ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल.
राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीत ३००० धावा ह्या सारख्याच अर्थात ६७ डावात काढल्या आहेत. एवढंच नाही तर ४००० धावा करण्यासाठी सुद्धा दोघांनी सारखेच ८४ डाव खेळले आहेत.