---Advertisement---

अखेर पुजाराने उलगडले तुफानी फॉर्मचे रहस्य! म्हणाला, “त्यांना पाहून मी बदललो”

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 6:42 PM
cheteshwar-sussex
---Advertisement---

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील शानदार फॉर्ममधून जात आहे. इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिप तसेच रॉयल लंडन कपमध्ये त्याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यानंतर आता एका क्रिकेट संकेतस्थळाशी तो समीक्षक म्हणूनही करारबद्ध झाला आहे. त्यात संकेतस्थळाशी बोलताना त्याने आता आपल्या त्याच शानदार फॉर्मचे गुपित उघड केले आहे.

पुजारा हा रॉयल लंडन कपमध्ये तुफान फॉर्ममध्ये दिसला. आपल्या संथ खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केली होती. आपल्या या नव्या अवताराबाबत बोलताना तो म्हणाला,
“माझ्या खेळाची ही नक्कीच वेगळी बाजू आहे. खेळपट्ट्या चांगल्या होत्या, फलंदाजीला पूरकही होत्या. मात्र, अशा खेळपट्टीवर तुम्हाला चांगल्या स्ट्राइक-रेटने धावा करण्याचे ध्येय ठेवायला हवे. या गोष्टीवर मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न करायचो. मी एक वर्षापूर्वी सीएसकेचा भाग होतो. तेथे मला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्या खेळाडूंना तयारी करताना पाहिले. तेव्हापासून मला वाटत होते की क्रिकेटच्या छोट्या प्रकारात यश मिळवायचे असल्यास मोठे फटके मारावे लागतीलच. रॉयल लंडन कपआधी मी ही गोष्ट प्रशिक्षकांना बोललो. आम्ही त्यावर काम केले आणि यशही मिळाले.”

रॉयल लंडन कपमध्ये कर्णधार म्हणून ससेक्ससाठी 9 सामने खेळताना त्याने 89 पेक्षा जास्तच्या सरासरीने आणि 3 शतकांच्या मदतीने 624 धावा काढल्या. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 111 असा प्रभावी राहिला. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

पुजाराने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी लाभली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ना प्रॅक्टीस ना क्रिकेटच्या चर्चा, फक्त पत्नीसोबत…! सूर्याने सांगितले विस्फोटक फलंदाजीचे रहस्य
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---