कसोटी स्पेशलिस्ट भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी रविवारी (१ नोव्हेंबर) संयुक्त अरब अमिराती (युएई)ला रवाना होणार आहेत. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सोमवारी जाण्याची शक्यता आहे. सध्या युएईत चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर भारतीय संघ तिथूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात अनसोल्ड राहिलेल्या पुजारा आणि विहारीसोबत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हेदेखील रविवारी युएईला जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर सर्व खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना ६ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. दरम्यान त्यांच्या २-३ कोविड-१९ चाचण्या होतील. त्यानंतरही त्यांना आयपीएलच्या जैव सुरक्षित वातावरणात सहभागी न होता वेगळे रहावे लागणार आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ४ सामन्यांची कसोटी, ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. त्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेतील सामने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि कॅनबरा स्टेडियममध्ये आयोजले जाऊ शकतात. कारण न्यू साउथ वेल्स सरकारने पाहुण्या भारतीय संघाला क्वारंटाईन कालावधीदरम्यान सरावाची परवानगी दिली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या दौऱ्याला अंतिम संमती मिळेपर्यंत, भारतीय संघ निवडकर्ते संघाची निवड करणार नाहीत. निवडकर्त्यांमध्ये याविषयी अधिकृत बोलणे झाले आहे. त्यानुसार क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघांची निवड करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?
अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ