काहीवर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये आपला दबदाबा निर्माण केलेल्या झिम्बाब्वे संघाचा गेल्या काहीवर्षीत दर्जा खालवला. याचा फटका त्यांच्या संघातील खेळाडूंना बसत असून त्यांना स्पॉन्सरशीप मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. नुकतेच झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लने शनिवारी (२२ मे) ट्विट करत याबद्दल व्यथा मांडली होती. त्याच्या या ट्विटला प्रतिसाद देत पुमा या कंपनीने स्पॉन्सरशीप देण्याचा अश्वासन दिले होते. आता त्यांनी त्यांचा शब्द पाळल्याचे दिसत आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
बर्लने शनिवारी ट्विट केले होते की ‘आम्हाला स्पॉन्सर मिळेल, असे पर्याय आहेत का, ज्यामुळे आम्हाला प्रत्येक मालिकेनंतर आमच्या बुटांना (बुटांचे सोल) चिटकवावे लागणार नाही.’ या ट्विटसह त्याने त्याच्या बुटांचा फोटोही शेअर केला होता. त्याचे हे ट्विट २४ तासात प्रचंड व्हायरल झाले होते. क्रिकेट रसिकांनी त्याला यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या होत्या.
अखेर बर्लच्या या ट्विटचा त्याला आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना फायदा झाला. त्याच्या या ट्विटनंतर २४ तासांच्या आतच पुमा कंपनीने (PUMA) त्याला प्रतिक्रिया देत संपूर्ण संघाला स्पॉन्सरशीप देण्याचे अश्वासन दिले. आता हे आश्वासन पूर्ण केले देखील आहे. सोमवारी पूमा कंपनीने क्रिकेट बुटांचे फोटो शेअर करत ट्विट केले की ‘रायन बर्ल आणि त्याच्या संघसहकाऱ्यांसाठी बुट पाठवत आहोत. आशा आहे की या बुटांचा रंग तुमच्या जर्सीच्या रंगाला मॅच करेल.’
Express shipment for @ryanburl3 and his mates. I hope the colours match the jersey. 😉 pic.twitter.com/Df8jxVQ8B3
— PUMA Cricket (@pumacricket) May 24, 2021
त्यामुळे आता हे स्पष्ट झाले की झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लवकरच पुमाकडून नवीन बुटांचे जोड मिळणार आहेत. बर्लनेही याबद्दल पुमा कंपनीचे आभार मानले आहेत. त्याने पुमाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत लिहिले की ‘पाहा काय येणार आहे. धन्यवात पुमा.’
Look what is on its way 🔜✈️
Thanks @pumacricket https://t.co/d8oqi25X6T
— Ryan Burl (@ryanburl3) May 24, 2021
पुमाच्या या ट्विटनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा फलंदाज केएल राहुलनेही या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.
💪💪
— K L Rahul (@klrahul) May 24, 2021
यापूर्वी जेव्हा बर्लने स्पॉन्सरशीपसाठी अपील केले होते, तेव्हा २४ तासांच्या आतच पुमा कंपनीने स्पॉन्सरशीप देण्याचे स्पष्ट केल्यानंतर बर्लने चाहत्यांसह कंपनीचेही आभार मानले होते. तो म्हणाला होता की ‘मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे की मी पुमाशी जोडला जात आहे. हे सर्व गेल्या २४ तासांत चाहत्यांच्या मदतीमुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. मी तुमचा कृतज्ञ राहिले. सर्वांचे धन्यवाद.’
I am so proud to announce that I’ll be joining the @pumacricket team. This is all due to the help and support from the fans over the last 24 hours. I couldn’t be more grateful to you all. Thanks so much @PUMA
— Ryan Burl (@ryanburl3) May 23, 2021
अशी आहे बर्लची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
अष्टपैलू असलेल्या २७ वर्षीय बर्लने २०१७ साली अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १८ वनडे सामने खेळले असून यात २४३ धावा केल्या आहेत आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ३९३ धावा यात केल्या आहेत आणि १५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४ धावा केल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा नवा लूक व्हायरल; चाहते म्हणतात, हा तर मनी हाईस्टमधील प्रोफेसरचा देसी व्हर्जन
काय सांगता! ३९ वर्षीय आईने १२ वर्षीय मुलासोबत रचला विक्रम, केली शतकी भागीदारी
टेस्ट चॅम्पियनशीप फायनल: पुजारा की टेलर कोण आहे सरस? पाहा ‘ही’ आकडेवारी