इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पूनम राऊतने खणखणीत अर्धशतक झळकावले आहे. सलामीवीर स्मृती मंधाना शून्य धावेवर बाद झाल्यावर एका बाजूने चांगला किल्ला लढवत तिने अर्धशतक झळकावले.
या अर्धशतकी खेळीत तिने २ चौकार आणि १ षटकार खेचला आहे. ही अर्धशतकी खेळी साकारण्यासाठी तिला ७५ चेंडूंचा सामना करावा लागला. सध्या भारत १२० धावांवर २ अशा चांगल्या स्थितीत असून हरमनप्रीत कौर नाबाद ४६ धावांवर खेळत आहे.