पुणे : राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तिसरी २३ वर्षांखालील फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन मुले व मुली यांसाठी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, पुणे जिल्हा कुस्ती संघाचे उपाध्यक्ष मोहन खोपडे, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्यकारी सदस्य मधुकर फडतरे, जयसिंग पवार, गणेश दांगट, ज्ञानेश्वर मांगडे, अविनाश टकले, योगेश पवार, संभाजीराव आंग्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी जाहीर केलेला पुणे शहर संघ पुढील प्रमाणे :
फ्री स्टाईल कुस्ती- मुले : ५७ किलो : अमोल वालगुदे : हनुमान आखाडा, ६१ किलो : सचिन दाताळ : मामासाहेब मोहोळ संकुल, ६५ किलो : ओंकार मोकाशी : हनुमान आखाडा, ७० किलो : शुभम थोरात : शिवरामदादा तालीम, ७४ किलो : आकाश डूबे : गोकुळ वस्ताद, ७९ किलो : अक्षय चोरघे : मामासाहेब मोहोळ संकुल, ८६ किलो : लौकिक सुर्वे : हनुमान आखाडा, ९२ किलो : आनंद मोहोळ ; सह्याद्री संकुल, ९७ किलो ; नीलेश केदारी : हनुमान आखाडा, १२५ किलो : पृथ्वीराज मोहोळ : खालकर तालीम
ग्रीको रोमन- मुले : ५५ किलो : अभिषेक शिळीमकर : नगरकर तालीम, ६० किलो : विशाल भिसे : गुलसे तालीम, ६३ किलो : पार्थ कंधारे : मुकुंद व्यायामशाळा, ६७ किलो : शुभम दुधाने, हनुमान आखाडा, ७२ किलो : मंगेश कोळी : आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, ७७ किलो : अक्षय चव्हाण : गोकुळ वस्ताद तालीम, ८२ किलो : शुभम शेटे : मामासाहेब मोहोळ संकुल, ८७ किलो : शुभम शेंडे : हनुमान आखाडा, ९७ किलो : सूरज गायकवाड : खालकर तालीम, १३० किलो : तुषार डूबे : आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल
मुली : ५० किलो : वृनाक्षी पुजारी : हनुमान आखाडा, ५३ किलो : श्रद्धा भोर : सह्याद्री संकुल, ५५ किलो : श्वेता भंडारकोटे, महाराष्ट्र मंडळ, ५७ किलो : संतोषी उभे : हनुमान आखाडा, ५९ किलो : अदिती नवले : जयनाथ तालीम, ६२ किलो : आकांक्षा नलावडे : मामासाहेब मोहोळ संकुल, ६५ किलो : दीप्ती गायकवाड : महाराष्ट्र मंडळ, ६८ किलो : कांचन सानप : हनुमान आखाडा, ७६ किलो : साक्षी शेलार : खाशाबा जाधव कुस्ती संकुल