सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या पर्वा बद्दल अनेक लोकांमध्ये उत्सुकता होती. पण उत्सुकतेबरोबरच अनेक लोक आयपीएल मी बघतचं नाही असे म्हणणारे देखील आहेत. अनेकांच्या मत असे पडते की आयपीएलने क्रिकेट या मूळ खेळाला धक्का बसतो आहे. असे वेड्या सारखे फटके मारणे म्हणजे क्रिकेट का..?? असा प्रश्न आयपीएल सुरु झाल्या पासून विचारला जात आहे. याला खरतर उत्तर आहे का नाही हे सांगणे अवघड आहे.
उद्या पुण्याच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याची आजघडीला केवळ १३,००० तिकीटे विकली गेली आहेत तर मैदानाची क्षमता ३६,००० इतकी आहे. दिल्ली सोबत होत असलेल्या या सामन्याला प्रेक्षकांनी का पाठ फिरवली हे पहायला हवे. शक्यता असू शकते की संघात कोहली, धोनी, गेल, डिव्हिलर्स सारखे नावाजलेले खेळाडू नाहीत असे असू शकेल. पण इतक्या कमी संख्येने प्रेक्षक जर मैदानात येणार असतील तर संघाचे मनोबळ कसे उंचावू शकेल.??
आयपीएलचा क्रेझ म्हणावा तसा राहिला नाही का .?? का लोकांना पुन्हा टेस्ट क्रिकेटचे वेध आणि प्रेम पुन्हा जागृत झाले आहे ..???