पुणे । भारताचा महान टेनिसपटू आणि १८ ग्रँडस्लॅम विजेता लिएंडर पेस टाटा महाराष्ट्र ओपन स्पर्धा खेळण्यासाठी आज पुण्यनगरीत दाखल झाला. स्पर्धेचा एकेरीचा ड्रॉ घोषित झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्याने कारकिर्दीतील अनेक गोष्टींवर तसेच भविष्यातील योजनांबद्दल मनमोकळेपणाने उत्तरं दिलं.
लिएंडर पेसच्या या खास गप्पांमधील काही विशेष मुद्दे-
प्रश्न: पुरव राजा आणि तुझ्या जोडीबद्दल काय सांगशील ?
लिएंडर: आम्ही गेल्या ३-४ महिन्यांपासून एकत्र खेळत आहोत. आम्ही आमची चांगली भागीदारी कशी चांगल्या रीतीने पुढे वाढवता येईल याचा विचार करत आहोत. पुरव पूर्णपणे वेगळ्याप्रकारचे दुहेरीचे टेनिस खेळतो. मी ज्या प्रकारचा खेळाडू आहे त्याचमुळे मी कोणत्याही खेळाडूशी सहज जुळवून घेतो. त्याचमुळे मला कारकिर्दीत यश मिळवता आले आहे. आम्ही दोघेही मुंबई राहतो. सराव एकत्र करतो त्याचमुळे आम्ही एकत्र येण्याचा विचार करत होतो.
प्रश्न: तुला एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेतून चॅलेंजर स्पर्धा खेळायला सुरुवात केलीस. तेव्हा तू स्वतःला कशी प्रेरणा दिली?
लिएंडर: माझ्यासाठी म्हणाल तर खेळाकडे आपण कसे पाहतो हे महत्वाचे आहे. मला हा खेळ खेळण्याची इच्छा आहे. स्पर्धा कोणतीही असो कोर्ट किंवा मैदानावरील रेषा कधी बदलत नाही. जेव्हा तुम्ही कुणाबरोबर भागीदारी बनवत असता तेव्हा तुम्हाला वेगवगेळ्या स्थरावर खेळावे लागते. त्यामुळे जेव्हा मी लयीत येईल तेव्हा पुन्हा मास्टर सिरीजमध्ये परतेल.
प्रश्न: क्रमवारीत चांगल्या स्थानी असणाऱ्या खेळाडूला इतर जोडीदाराशी जुळवून घेणे किती अवघड असते?
आजकाल क्रमवारी आता पूर्णपणे बदलली. तुम्ही जर पहिल्या ३० जणांत असाल तर तुम्ही शक्यतो खेळाडू बदलत नाही. परंतु तरीही याची काही खात्री देता येत नाही. वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी आपण जर पहिले तर सर्व जोडीदार हे बदललेले असतात. त्यामुळे येथे खेळणारे अनेक खेळाडू हे पुढच्या काही आठवड्यात दुसऱ्या जोडीदाराबरोबर खेळताना दिसतील. केवळ पहिल्या १० जोड्या शेवटपर्यंत एकत्र असतात.
प्रश्न: आजकाल दुहेरीत खेळणं खूप अवघड झालं आहे?
हो नक्कीच. एकेरीचे आणि दुहेरीचे असे बरेच खेळाडू यात खेळत असल्यामुळे आणि स्कोरिंग आणि क्रमवारी बदलली असल्यामुळे नक्कीच अवघड झाले आहे. जुन्या काळात जेव्हा खेळाडू ग्रँडस्लॅम जिंकायचे तेव्हा ते त्याचबरोबर खेळत राहायचे. आता ग्रँडस्लॅम जिंकल्यावर ६ महिन्यात खेळाडू दुसरा जोडीदार शोधतात.
प्रश्न: तुला पुण्यात खेळायला आवडते का?
नक्कीच. हे माझ्या घराजवळ आहे. मी मुंबईमध्ये राहतो आणि मला येथे गाडी चालवत यायला केवळ २तास लागतात. मी जेव्हा पुण्यात ह्याचवर्षी डेव्हिस कप खेळलो होतो तेव्हा मुंबई आणि पुण्यातील चाहते येथे पाठिंबा द्यायला आले होते. त्याचमुळे मला असे वाटते की स्टॅन्ड पुन्हा भरतील आणि मला मोठ्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांसमोर खेळायला आवडेल.
Watch:
https://www.youtube.com/watch?v=rRxchoGJDi8&feature=youtu.be