पुणे। बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस या संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी-कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यात बार्कलेज संघाने टिएटो संघावर पाच गडी राखून मात केली. टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४१ धावा केल्या. बार्कलेज संघाने हे आव्हान १८.४ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
दुस-या लढतीत पुनित करणच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कॉग्निझंट संघाने मर्स्क संघावर तीन गडी राखून मात केली. कॉग्निझंट संघाने मर्स्क संघाला १९ षटकांत १५३ धावांत रोखले. एक वेळ मर्स्क संघाची १ बाद १०४ अशी चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर या संघाचा डाव गडगडला. यातील पाच फलंदाज धावबाद झाले.
कॉग्निझंट संघाने विजयी लक्ष्य १९.३ षटकांत पूर्ण केले. पुनितने तीन गडी बाद केले आणि नंतर नाबाद ४५ धावांची खेळी करून सामनावीरचा मान मिळवला. तिस-या लढतीत टेक महिंद्रा संघाने सिंक्रॉन संघावर १५ धावांनी मात केली, तर इन्फोसिस संघाने केपजेमिनी संघावर ७४ धावांनी मात केली. यात इन्फोसिसच्या साईनाथ शिंदेने ४४ चेंडूंत ६६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
१) टिएटो – २० षटकांत ५ बाद १४१ (इम्तियाझ शेख ४१, गणेश आंब्रे ३९, विनायक सावंत २०, दत्तात्रय राउती २-२३, विलक्षण दादवळ १-२७, कनिष्कसिंग १-३३) पराभूत वि. बार्कलेज – १८.४ षटकांत ५ बाद १४२ (कनिक्षसिंग ३२, सागर अगरवाल ३१, शशांक दीक्षित नाबाद ३०, अभिषेक श्रीवास्तव २७, धनाजी काळके २-३२, पुष्पेंद्र सिंग १-२६).
२) मर्स्क – १९ षटकांत सर्वबाद १५३ (राघव त्रिवेदी ४४,वैभव महाडिक ३०, प्रसाद गिरकर २७, पुनीत करण ३-३७, मिन्हाज अली १-२१) पराभूत वि. कॉग्निझंट – १९.३ षटकांत ७ बाद १५५ (पुनित करण नाबाद ४५, प्रथमेश देशपांडे ४१, अभिषेक राय २-२६).
३) टेक महिंद्रा – २० षटकांत ७ बाद १४५ (विनीत पाठक ४९, जावेद सय्यद २८, रोहित बंदिवाडेकर २-२४, हर्षद जोशी २-१२, सौरभसिंग २-१४) वि. वि. सिंक्रॉन – १८.२ षटकांत सर्वबाद १३० (संजयसिंग ४९, हार्दिक कोरी २७, सौरभ देवरे ३-१६, सचिन कुलकर्णी २-३५).
४) इन्फोसिस – २० षटकांत ७ बाद १७० (साईनाथ शिंदे ६६, प्रभज्योत मल्होत्रा ३५, गौरव बाबेल नाबाद २६, विक्रांत बांगर ३-२६, चंद्रमौली रेड्डी २-३७) वि. वि. केपजेमिनी – २० षटकांत ७ बाद ९६ (रॉबिन जोशी नाबाद ५८, रवी थापलियल ३-१५, आशय पालकर १-७).