पुणे। टीसीएस, अटॉस, यार्डी सॉफ्टवेअर, सिमन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या लढतीत टीसीएस संघाने व्हेरिटास संघावर एक गडी राखून मात केली. सुशांत मुळे आणि स्वानंद भागवत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर व्हेरिटास संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५५ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल टीसीएस संघाने ९ गडींच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य अखेरच्या षटकात पूर्ण केले. दुस-या लढतीत अटॉस संघाने इंडियन बँक संघावर ९ गडी राखून सहज मात केली. अटॉस संघाने इंडियन बँक संघाला ६ बाद १५५ धावांत रोखले. यानंतर विजयी लक्ष्य १८.१ षटकांत १ गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात चिन्मय मालवणकरने ५९ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या.
तिस-या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने एचएसबीसी संघावर सात गडी राखून मात केली. चौथ्या लढतीत सिमन्स संघाने केपीआयटी संघावर ७४ धावांनी मात केली. सिमन्स संघाने ७ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना केपीआयटी संघाला ९ बाद ११९ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक –
१) व्हेरिटास – २० षटकांत ४ बाद १५५ (सुशांत मुळ्ये ६९, स्वानंद भागवत ५३, तेजपालसिंग १-२९) पराभूत वि. टीसीएस – २० षटकांत ९ बाद १५६ (निकुंज अगरवाल नाबाद ४१, सुनील बाबर ३६, देव ऱॉबीन चौधरी ३-२४, कपिल कुरळेकर २-३०, मुनिराज तोमर २-१८).
२) इंडियन बँक – २० षटकांत ६ बाद १५५ (विजय के. नाबाद ४९, आदित्य साळुंखे ३८, रुपेश खिराड २-१४, हर्षद तिडके २-३२, महेश भोसले १-१९) पराभूत वि. अटॉस – १८.१ षटकांत १ बाद १५७ (चिन्मय मालवणकर नाबाद ८५, महेश भोसले नाबाद ३३, आदित्य साळुंखे १-१८).
३) एचएसबीसी – २० षटकांत ६ बाद १६१ (संजय लोखंडे ५९, नवीद श्रीनिवास २९, प्रभुल पीके २-३०, गौतम तुळपुळे १-३८, पंकज एल. १-३७) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर – १७.३ षटकांत ३ बाद १६४ (पंकज एल. नाबाद ७६, पार्थ शहा २६, नवीद श्रीनिवास २-३४).
४) सिमन्स – २० षटकांत ७ बाद १९३ (सौम्य मोहंती ६१, रोहन पवार ४३, विशाल रैना ३३, वनराज परमार २-२७, प्रशांतकुमार २-४२) वि. वि. केपीआयटी – २० षटकांत ९ बाद ११९ (कमलेश सुर्वे ३५, तुषार वैंगणकर २३, नमन शर्मा ४-१८, मनोज भागवत ३-२२).