महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष मा.ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ‘ पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2018’ पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 19 ते 22 जुलै या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेली आहे.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील खेळाडूंना मॅटवर खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
या स्पर्धेसाठी 8 जुलै रोजी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत आंदाजे 860 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामुळे पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी दोन संघ संयोजकांना वाढवाव्या लागल्या आहेत.
या स्पर्धेतील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पंच यांना संयोजन समीती तर्फे किट देण्यात येणार आहे.
पुणे लीग कबड्डी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघातील प्रत्येकास 10,000 रुपये, द्वितीय येणाऱ्यास 7,500 रुपये आणि तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूस प्रत्येकी 5000 रुपये देँण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाई व पकड यांनाही वैयक्तिक 15,000 रुपये पारितोषिके देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असुन इनडोअर बॉक्सिंग हॉलमध्ये मॅटवर घेतली जाणार आहे. 21 आणि 22 जुलैला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने रंगतील.