पुणे, 12 जानेवारी 2023: लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंच्युरी व स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुणे लायन्स संघाने रहाटणी वॉरियर्स संघाचा पराभव करत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला.
क्रिकेट नेक्स्ट अकादमी मैदानावर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात विजय शितोळेच्या अचूक गोलंदाजीच्या बळवार पुणे लायन्स संघाने रहाटणी वॉरियर्स संघाचा 2 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विजय शितोळे, महेश भट व पुष्कराज जोशी यांच्या अचूक गोलंदाजीने रहाटणी वॉरियर्स संघाचा डाव 17.5 षटकात सर्वबाद 114 धावांत रोखला. 114 धावांचे लक्ष अमित पार्लेच्या 29, शेखर दालमियाच्या 17 व गिरीश ओकच्या नाबाद 14 धावांसह पुणे लायन्स संघाने 17.2 षटकात 8 बाद 115 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. 26 धावात 3 गडी बाद करणारा विजय शितोळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रहाटणी वॉरियर्स: 17.5 षटकात सर्वबाद 114 धावा(अतिष थोरात 17(11, 3 x4), सिकंदर पाटील 16(9, 2×4 ,1 x6), पराग राज 12(6, 1 x4, 6 x6), विजय शितोळे 3-26, महेश भट 3-17, पुष्कराज जोशी 2-9, बाबा एन 1-7) पराभूत वि पुणे लायन्स: 17.2 षटकात 8 बाद 115 धावा(अमित पार्ले 29(14, 2×4, 3×6), शेखर दालमिया 17(17, 2 x4), गिरिष ओक नाबाद 14, दर्शन वानगे 4-27, प्रितम काईया 2-32) सामनावीर- विजय शितोळे
पुणे लायन्स संघाने 2 गडी राखून सामना जिंकला. (Pune Lions win the Lions Adult T20 Cricket Tournament in memory of Lion Shantanu Siddha)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोंड आवर हार्दिक! चालू सामन्यात केली आपल्याच खेळाडूला शिवीगाळ; पाहा व्हिडिओ
मागील दोन वर्षांत सिराजच ठरलाय टीम इंडियाच्या गोलंदाजीचा ‘सरताज’! आकडे हेच सांगतात






