पुणे | सिंम्बॉयसिस क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुणे महापौर कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरूष विभागात अ गटातील बदामी हौद संघाने महाराष्ट्र रहाटणी संघावर 33-30 असा निसटता विजय मिळविला.
मध्यंतराला बदामी हौद 16-19 असा पिछाडीवर होता. मध्यंतरापुर्वी दोन्ही संघानी एक एक लोन लावला होता रूमध्यंतरा नंतर बदामी हौद संघाने आपले आक्रमण वाढवित आपली पिछाडी भरून काढत विजय मिळविला.
बदामी हौद संघाच्या आकाश दिसले याने चांगला खेळ केला. तर महाराष्ट्र संघाच्या गणेश ठेरंगे व अक्षय नखाते यांनी चांगला प्रतिकार केला. को बलाढ्य कोल्हापूरच्या शाहू सडोली संघाने सरस्वती संघावर 32-17 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला शाहू सडोली संघाकडे 19-10 अशी आघाडी होती.
शाहू सडोली संघाच्या महेश मगदूम व राजवीर चव्हाण यांनी खोलवर चढाया करीत आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यांना विवेक भूईटे याने चांगल्या पकडी घेत साथ दिली. सरस्वती संघाच्या निशांत सितारकर व अथर्व थोरवे यांनी चांगला प्रतिकार केला.
नंदुरबारच्या एनटीपीसी संघाने बालाजी प्रतिष्ठान संघावर 45-18 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला एनटीपीसी संघाकडे 25-7 अशी भक्कम आघाडी होती. एनटीपीसी संघाच्या शुभम बारमाटे याने उत्कृष्ठ खेळ करीत आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याला मोहन कचरे याने चांगल्या पकडी घेत चांगली साथ दिली. बालीजी प्रतिष्ठान संघाच्या मयुर ठाकुर एकाकी लढत दिली.
महिला विभागा- अ गटातील गबलाढ्य राजमाता जिजाऊ संघाने स्फुर्ती संघावर 53-2 असा एकतर्फी विजय मिळविला. मद्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे 29-1 अशी निर्णायक आघाडी होती. सामन्याच्या सुरवाती पासूनच राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या राजमाता संघाने आक्रमक धोरण स्विकारत सहज विजय मिळविला.
राजमाता जिजाज विजय संघाच्या पालवी जमदाडे व ऋतुजा निगडे यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. त्यांना पुनम तांबे व मानसी सावंत यांनी चांगल्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. ड गटात एमएच स्पोर्टस् संघाने प्रतिष्ठान संघावर 48-21 असा सहज विजय मिळविला. मद्यंतराला एमएच स्पोर्टस् संघाकडे 21-10 अशी आघाडी होती. एमएच स्पोर्टस् संघाच्या अंकिता मोहोळ व प्रतिक्षा कऱ्हेकर यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सह्याद्री प्रतिष्ठानच्या सायली कचरे हिने एकाकी लढत दिली.
पुरूषांचा झालेले इतर सामने- ओम साई चिखली वि.वि. दसपटी चिपळूण(39-29), बंड्या मारूती मुंबई शहर वि.वि. क्रीडा प्रबोधिनी नासिक (54-19), राणा प्रताप संघ वि.वि. टीबीएम रायगड(46-33),.एन.टी.पी.सी. नंदूरबार वि.वि. बालाजी प्रतिष्ठान (45-18)
महिलांचे झालेले इतर सामने.- जय हनुमान बाचणी वि.वि. शिव ओम (33-18),सुवर्णयुग वि.वि. धर्मवीर बालेवाडी(45-23),श्री साई सोर्टस् नासिक वि.वि. वाघेश्वर स्पोर्टस् (45-36), जागृती प्रतिष्ठान वि.वि. स्वराज्य संघ मुंबई(30-20). अनिकेत खेड रत्नागिरी वि.वि. दिशा प्रतिष्ठान(41-18). महेशदादा स्पोर्टस् फाउंडेशन वि.वि. रुक्माई संघ सोलापूर (48-16).
महत्त्वाच्या बातम्या-
–तेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील
–न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया