पुणे । नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या अंकिता रैना, युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवा, स्लोव्हेनिया तामरा झिदनसेक, रशियाच्या मरिना मेलनिकोवा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैना हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत रशियाच्या अमिना अंशाबाचा 6-2, 6-1असा एकतर्फी पराभव केला. रशियाच्या मरिना मेलनिकोवाने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या जेनिफर लुईखेमचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-3असा पराभव केला.
चीनच्या कै-लीन झाँगला भारताच्या ऋतुजा भोसलेने विजयासाठी चांगलेच झुंजवले. झाँगने ऋतुजावर टायब्रेकमध्ये 7-6(6), 7-6(5)असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. सहाव्या मानांकित इस्राईलच्या डेनिझ खझानुक हिने भारताच्या स्नेहल मानेला 6-3, 6-1असे नमविले. युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवा हिने सातव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या कॅटी ड्युनचा 6-1, 6-3असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आठव्या मानांकित नेदरलॅंडच्या क्युरिनी लेमणीने क्वालिफायर स्लोव्हेनियाच्या पीआ कूकचे आव्हान 6-1, 6-1असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि.या-सुआन ली(तैपेई) 6-3, 6-3;
अंकिता रैना(भारत)(2)वि.वि.अमिना अंशाबा(रशिया) 6-2, 6-1;
मरिना मेलनिकोवा(रशिया)वि.वि.जेनिफर लुईखेम(भारत) 7-6(2), 6-3;
कै-लीन झाँग(चीन)वि.वि.ऋतुजा भोसले(भारत) 7-6(6), 7-6(5);
डेनिझ खझानुक(इस्राईल)(6)वि.वि.स्नेहल माने(भारत) 6-3, 6-1;
व्हॅलेरिया स्राखोवा(युक्रेन)वि.वि.कॅटी ड्युन(ग्रेट ब्रिटन)(7) 6-1, 6-3;
क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड)(8)वि.वि. पीआ कूक(स्लोव्हेनिया) 6-1, 6-1;
ओल्गा दोरोशीना(रशिया)(5)वि.वि.कॅतरझायना कावा(पोलंड) 6-3, 6-2;
रेका-लुका जनी(हंगेरी)वि.वि.कायलाह मॅकफी(ऑस्ट्रेलिया) 1-6, 7-6(2), 7-6(3)
जॅकलिन अडीना क्रिस्टियन वि.वि.मियाबी इनाऊ(जपान) 6-1, 7-5
जिया-जिंग लु(चीन)(3)वि.वि.कॅटरझयाना पीटर(पोलंड) 6-1, 2-6, 6-4
दुहेरी गट: पहिली फेरी:
अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)वि.वि. मारिया मारफुतीना(रशिया)/ऍना मोर्जिणा(रशिया) 6-1, 6-0
ऍना वेसलिनोविच/ याशिना इक्तेरिना(रशिया)वि.वि.मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया)/अल्बिना खबिबुलीना(उझबेकिस्तान) 7-6(2), 6-4