पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा 46-35 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा 46-35 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.
पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स आस्मि टिळेकर, अभिराम निलाखे, वैष्णवी सिंग, सिमरन छेत्री, अमोद सबनीस, अर्णव बनसोडे, दक्ष पाटील, मनन अगरवाल, ईशान्या हटनकर, अमन शहा यांनी अफलातून कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून क्रिशय तावडे, शिवतेज श्रीफुले, आर्यन हूड, अनन्मय उपाध्याय/अनिश रांजलकर यांनी विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स वि.वि.इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स 46-35
एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: अचिंत्य कुमार पराभूत वि.क्रिशय तावडे 1-4;
10वर्षाखालील मुले: राम मगदूम पराभूत वि. शिवतेज श्रीफुले 2-4; 10 वर्षाखालील मुली: आस्मि टिळेकर वि.वि.प्रेक्षा प्रांजल 4-3(2);
12 वर्षाखालील मुले: अभिराम निलाखे वि.वि.पार्थ काळे 6-3; 12वर्षाखालील मुली: वैष्णवी सिंग वि.वि.सहाना कमलाकन्नन 6-0;
14वर्षाखालील मुले: सार्थ बनसोडे पराभूत वि.आर्यन हूड 2-6; 14वर्षाखालील मुली: सिमरन छेत्री वि.वि.सिद्धी खोत 6-2; कुमार दुहेरी मुले: अमोद सबनीस/अर्णव बनसोडे वि.वि.दिव्यांक कवितके/हिमनिश बांगीया 6-1;
14वर्षाखालील मुले दुहेरी: आदित्य भटवेरा/आदित्य राय पराभूत वि. अनन्मय उपाध्याय/अनिश रांजलकर 3-6;
10 वर्षाखालील मुले दुहेरी: दक्ष पाटील/मनन अगरवाल वि.वि.अहान सारस्वत/वरद उंडरे 4-1; मिश्र दुहेरी:ईशान्या हटनकर/अमन शहा वि.वि.पृथ्वीराज हिरेमठ/राजलक्ष्मी देसाई 6-5(2);