पुणे । तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाडूचे प्रदर्शन करून १०९ गुणांसह उपविजेतेपद पटकावले.
झारखंडच्या संघाने ११९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. मणिपूरचा संघ ९९ गुणांसह तिसºया स्थानावर राहिला.
खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम ही झाली. तब्बल ९ वषार्नंतर ही स्पर्धा महाराष्ट्रात झाली. या स्पर्धेत देशातून ३५ राज्यातून १४५० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले.
या वेळी रामपुरी गोस्वामी, उद्योजक आबा झोडगे, आयोजन समिती चेअरमन संदीप ओंबासे, आयोजन समिती अध्यक्ष सुरेश चौधरी, डॉ. प्रसाद कुलकर्णी, समाजसेवक अजय पांडे, पद्माकर कांबळे, परवेझ खान, तुषार आवटी, दिनेश शिर्के, गफ्फार पठाण, नितीन गुंडा आदी मान्यवर उपस्थितीत होते.