पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत डेक्कन अ, डेक्कन ब या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात डेक्कन ब संघाने मगरपट्टा बसंघाचा 24-11 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून धनंजय सुजय, इंद्रनील दाते, बाबू जाधव, अमिश आठवले, बाळू जोशी, अमोलबापट, कौस्तुभ शहा, मनोज देशपांडे यांनी अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात नंदन बाळ, अमित पाटणकर, संग्राम चाफेकर, ऋषिकेश पाटसकर, अजय कामत, जयदीप दाते, मंदार वाकणकर, मुकुंद जोशी यांच्या विजयीकामगिरीच्या जोरावर डेक्कन अ संघाने ओडीएमटीचा 24-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
डेक्कन ब वि.वि.मगरपट्टा ब 24-11(100अधिक गट: धनंजय सुजय/इंद्रनील दाते वि.वि.प्रदीप मित्रा/रतिश रतूसाविया 6-5(7-3); खुला गट: बाबू जाधव/अमिशआठवले वि.वि.वरुण भटनागर/अमनदीप सिंग 6-0; 90अधिक गट: बाळू जोशी/अमोल बापट वि.वि.कृष्णा नारायणा/मयूर पारेख 6-3; खुला गट: कौस्तुभ शहा/मनोज देशपांडे वि.वि.रतिश रतूसाविया/प्रदीप जगदाळे 6-3)
डेक्कन अ वि.वि.ओडीएमटी 24-3(100अधिक गट: नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.उमेश दळवी/ज्ञानेश्वर कारकर 6-2; खुला गट: संग्राम चाफेकर/ऋषिकेशपाटसकर वि.वि.विशाल जाधव/राहुल पाटील 6-1; 90अधिक गट: अजय कामत/जयदीप दाते वि.वि.राम नायर/अमित धांड6-0; खुला गट: मंदार वाकणकर/मुकुंदजोशी वि.वि.कौस्तुभ देशमुख/हिमांशू कपटिया 6 -0) .