पुणे। चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडवरून भारतीय संघ थेट विंडीजला रवाना झाला. तिकडून हा संघ श्रीलंका देशात तीन मालिका खेळला. आता ८ दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेतील ५ वनडे सामन्यांपैकी पाचवा वनडे सामना १ ऑक्टोबर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात होणार आहे. त्यानंतर न्युझीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला आणि दुसरा सामना महाराष्ट्रात होणार आहे.
या मालिकेतील सराव सामने १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी ब्रेबॉन स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे तर पहिला वनडे सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी अर्थात २५ ऑक्टोबर रोजी दुसरी वनडे पुणे येथे होणार आहे.
आजपर्यंत गहुंजे, पुणे येथे झालेले सामने:
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियम, गहुंजे येथे आजपर्यंत ५ आंतरराष्ट्रीय सामने झाले असून त्यात एक कसोटी, २ वनडे आणि २ टी२० सामने झाले आहेत. यात फेब्रुवारी २०१७ मध्ये कसोटी सामन्यात ऑस्टेलियाने भारताला तब्बल ३३३ धावांनी पराभूत केले होते. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला वनडेमध्ये तर जानेवारी २०१७ला भारताने इंग्लंडला वनडे सामन्यात पराभूत केले आहे. टी२० सामन्यात २०१२ला भारताने इंग्लंडला तर २०१६ मध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१२ सप्टेंबर । सराव सामना । चेन्नई
१७ सप्टेंबर । पहिली वनडे । चेन्नई
२१ सप्टेंबर । दुसरी वनडे । कोलकाता
२४ सप्टेंबर । तिसरी वनडे । इंदोर
२८ सप्टेंबर । चौथी वनडे । बेंगळुरू
१ ऑक्टोबर। पाचवी वनडे । नागपूर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
०७ ऑक्टोबर। पहिली टी२० । रांची
१० ऑक्टोबर। दुसरी टी२० । गुवाहाटी
१३ ऑक्टोबर। तिसरी टी २० । हैद्राबाद
न्युझीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१७ ऑक्टोबर । पहिला सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
१९ ऑक्टोबर । सराव सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
२२ ऑक्टोबर । पहिली वनडे । मुंबई
२५ ऑक्टोबर । दुसरी वनडे । पुणे
२९ ऑक्टोबर । तिसरी वनडे । युपीसीए
न्युझीलँड विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
०१ नोव्हेंबर। पहिली टी२० । दिल्ली
०४ नोव्हेंबर। दुसरी टी२० । राजकोट
०७ नोव्हेंबर। तिसरी टी २० । तिरुणानंतरपूरम