मुंबई आणि पुण्यामध्ये होणार अंतिम सामना !!!!!
आयपीएल १० मधील महाराष्ट्राचे दोनही संघ म्हणजे रायझिंग पुणे सुपरजायन्ट आणि मुंबई इंडियन्स हे या वर्षीच्या फायनलमध्ये पोहचले आहेत. आता आयपीएलचा कप दोन वर्षनंतर परत महाराष्ट्रात येणार हे नक्की झाले आहे. फक्त विजेती भारताची संस्कृतीक राजधानी होणार की आर्थिक राजधानी हे रविवारीच कळेल.
या वर्षी झालेल्या पुणे आणि मुंबई मधील तीनही सामन्यात पुण्याने मुंबईला हरवले आहे. त्यामुळे मुंबई दडपणाखाली असणार आहे तर पुण्याचा आत्मविश्वास शिखरावर असणार आहे. मुंबईने २०१७च्या अंकतालिकेत पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होत तर पुणे दुसऱ्या स्थानी होते. पहिल्या क्वालिफायरमध्ये पुण्याने मुंबईला २० धावांनी पराभूत केले होते. त्याआधी लीग सामन्यांमध्ये एका सामन्यात ३ धावांनी आणि एका सामन्यात ७ विकेट्सने पुण्याने मुंबईला पराभूत केले होते. पुण्याचा विदेशी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या इंग्लंडला परतीमुळे संघात एक पोकळी तयार झाली आहे . पुण्याकडे बेन स्टोक्स सारखा उत्तम फलंदाज आणि त्याच श्रेणीचा गोलंदाज दुसरा कोणी नाही.
तर दुसरीकडे मुंबई संघात परत संधी मिळाल्यावर मिचेल जोहान्सन आणि अंबाती रायडूसारखे राखीव खेळाडूही संघात चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. क्वालिफायर २ मध्ये मुंबईने कोलकात्याच्या फलंदाजीची कंबर मोडली, त्यामध्ये करण शर्मा या फिरकी गोलंदाजांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईच्या गोलंदाजीचा भार बुमरा आणि मलिंगाच्या खांदयावर आहे. तर फलंदाजीचा भार पार्थिव पटेल आणि पोलार्ड यांच्यावर असेल
पाहुयात कोण असतील दोन्ही संघाचे ११ मधील खेळाडू
मुंबई इंडियन्स :
लेंडान सिमन्स, पार्थवी पटेल, रोहित शर्मा, आंबती रायडू, किएरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, करण शर्मा, मिचेल जोहान्सन, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा .
रायझिंग पुणे सुपर जायंट :
अजिंक्य राहणे, राहुल त्रिपाठी, स्टिव्ह स्मिथ, महेंद्र सिंग धोनी, मनोज तिवारी, डॅनिएल क्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, ऍडम झाम्पा, जयदेव उनाडकट, लॉकिय फर्गसन.