पुणे : पुणेरी वॉरियर्स आणि भारती एफसी संघांमध्ये पीडीएफए फुटबॉल लीगच्या नव्या मोसमातील तिसऱ्या श्रेणीतील अंतिम लढत रंगणार आहे. पुणेरी वॉरियर्सने टायब्रेकरमध्ये नॉईजी बॉईजद संघाचा ६-५ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत भारती एफसीने देखिल टायब्रेकरमध्ये एएफए सॅमफोर्ड संघाचा टायब्रेकरमध्ये ५-४ असा पराभव केला.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत पुणेरी वॉरियर्सने नियोजित वेळेत नॉईजी बॉईजविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला होता. दोनवेळा पिछाडी भरून काढत पुणेरी वॉरियर्सने ही किमया साधली. नॉईजी बॉईजसाठी ११व्या मिनिटाला अक्षय दगडेने गोल करून आघाडी मिळविली. त्यानंतर पियुष कुलकर्णीने ३५व्या मिनिटाला पुणेरी वॉरियर्सला बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात ४१व्या मिनिटाला आयुज कुटेने पुन्हा एकदा नॉईजी बॉईजला आघाडीवर नेले. मात्र, तीनच मिनिटांनी म्हणजे ४४व्या मिनिटाला मनीष देशमुख याने पुणेरी वॉरियर्सला पुन्हा एकदा बरोबरीवर आणले. ही बरोबरी पुढे सामना संपेपर्यंत कायम राहिली.
टायब्रेकरकमध्ये पुणेरी वॉरियर्सकडून प्रशांत कवडे, अनिकेत गुप्ता, विकास गुप्ता, प्रसाद नाईक यांनी गोल केले, तर नॉइझी बॉईजकडून आयुज कुटे, अक्षय दगडे, दीपांकुर शिंदे यांनी आपले प्रयत्न यशस्वी केले. नॉइझी बॉईजसाठी ओम पाटणकर, दिनेश राठोड आणि प्रथमेश पिल्ले हे खेळाडू चुकले, तर पुणेरी वॉरियर्सकडून मनीष देशमुख आणि ओंकार रसाळ यांनी संधी गमावली.
दुस-या उपांत्य फेरीत श्रावण खडसे (३६वे मिनिट) याने एएफए सॅमफोर्डला आघाडी मिळवून दिली होती. त्यांनी अगदी अखेरच्या मिनिटापर्यंत ही आघाडी कायम राखली. मात्र, अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या म्हणजे सामन्यातील ६३व्या मिनिटाला अमनदिप सिंगने लक्षवेधक गोल करून भारती एफसीला बरोबरी साधून दिली.
निर्णयासाठी घेण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये भारती एफसीकडून अमनदिप सिंग, सिद्धार्थ सिंग, नागायसन स्वेर, करण यादव यांनी गोल केले, तर भारती एफसीरकडून मनवेल पिल्ले, एल्विन फ्रान्सिस, श्रवण खडसे यांनी संधी अचूक साधली. एएफए सॅमफोर्डसाठी अमन मदुराई आणि अभिषेक चिन्ना त्यांचे प्रयत्न चुकले, तर भारती एफसीकडून अमर्त्य कुशचा प्रयत्न फसला.
निकाल –
एसएसपीएमस मैदान तिसरी श्रेणी (उपांत्य फेरी)
पुणेरी वॉरियर्स: 2 (4) (पीयूष कुलकर्णी 35वे, मनीष देशमुख 44वे,मिनिट) (टायब्रेकर – प्रशांत कवडे, अनिकेत गुप्ता, विकास गुप्ता, प्रसाद नाईक) वि.वि. नॉइझी बॉईज: 2 (3) (अक्षय दगडे 11वे, आयुज कुटे, थे मिनिट) (टायब्रेकर – आयुज कुटे, अक्षय दगडे, दिपांकुर शिंदे)
भारती एफसी1(4) (अमनदिप सिंग ६३वे मिनिट) (टायब्रेकर – अमनदिप सिंग, सिद्धार्थ सिंग, नागायसन स्वेर, करण यादव) वि.वि. एएफए सॅमफोर्ड 1(3) (श्रवण खडसे 36वे मिनिट) (टायब्रेकर – मनवेल पिल्ले, एल्विन फ्रान्सिस, श्रवण खडसे)
द्वितीय श्रेणी – सुपर-8
उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: ० बरोबरी वि. घोरपडी तमिळ युनायटेड: 0
डायनामाइट्स: 2 (आदित्य खाडे 57आणि 60वे मिनिट) बरोबरी वि. जायंट्स ‘अ’: 2 (अंशुल शर्मा 11वे आणि निखिल शेलार 42वे मिनिट)
न्यू इंडिया सॉकर: 1 (कीथ इव्हान्स 21वे मिनिट) वि.वि. एफसी बेकडिन्हो: 0
डेक्कन इलेव्हन सी ० बरोबरी वि. राहुल एफए: 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
विराट-केएल राहुलपेक्षा रिषभ पंत सरस, रोहितच्या अनुपस्थित भारतीय संघासाठी प्रथमच केलं ‘हे’ काम