---Advertisement---

पुणे वॉरियर्सचा विजय, तर सिटी एफसीची ईगलशी बरोबरी

On: रविवार, मे 22, 2022 11:58 PM
Football
---Advertisement---

पुणे। पुणे वॉरियर्सने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत एएफए सॅमफोर्डचा पराभव केला, तर सिटी एफसी पुणेला ईगल एफसीविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले रविवारी झालेल्या १६ वर्षांखालील गटाच्या सामन्यात गोलचा पाऊस पडला.

तृतीय श्रेणी गटातील लढतीत पुणेरी वॉरियर्सने एएफए सॅमफोर्डचा ७-१ असा धुव्वा उडवला. अनिकेत गुप्ता (२३वे मिनिट), रोहन राऊत (४५वे मिनिट) विवेक घलांड (४९वे मिनिट), प्रसाद नाईक (५२वे मिनिट), पियुष कुलकर्णी (५४वे मिनिट) संकेत डोंगरे (५७वे मिनिटे-पेनल्टी), शंतनु खानापुरे (६०वे मिनिट) यांनी एकेक गोल करून संघाचे गोलाधिक्यवाढवले. एएफए सॅमफोर्डकडून नेल्सन पास्ते याने ६१व्या मिनिटाला एकमात्र गोल केला.

जी गटातील सामन्यात सीटीएफसी पुणे आणि ईगल एफसी या प्रतिस्पर्धी संघांकडून हॅट्रिकची नोंद झाल्यानंतरही सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. दुर्वेश वाळकेने ८, १५ आणि ४८व्या मिनिटाला सीटीएफसीसाठी हॅट्रिक केली. त्यांतर ईगलकडून जतिंदर चौहान याने २८, ५४ आणि ६३व्या मिनिटाला हॅटट्रिक पूर्ण केली.

पुणे पायोनिर्स एफसी संघाने चुरशीने झालेल्या सामन्यात ब्लॅकहॉक्सचा ३-२ असा पराभव केला. मिका शेख याने दोन गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. सार्थ कांबळेने तिसरा गोल केला. ब्लॅकहॉक्स संघांच्या यश भोईर आणि प्रतिक शिंघे यांनी गोल केले.

अ गटातील सामन्यात परशुरामियन्स एससी ब संघाने हायलॅंडर्स एफसीवर २-० असा विजय मिळविला. उझेर बारी आणि सारंग दातार यांनी गोल केले.

एसएसपीएमएस मैदानावरील १६ वर्षांखालील गटाच्या सामन्यात चार सामन्यातून २६ गोलची नोंद झाली. क्रीडा प्रबोधिनी संघाने सिटी एफसीचा ९-०, लौकिक एफएने ४लायन्स एफएवर ६-०, गेम ऑफ गोल एफसीसीने जु्न्नर तालुक्याचा ६-२ आणि स्टेपओव्हर एफएने बेटा स्पोर्टसचा ५-० असा पराभव केला.

निकाल-
सप महाविद्यालय मैदान-
गट एफ -गोल्डन फेदर्स ० बरोबरी वि. थंडरकॅटस ब ०
पुणेरी वॉरियर्स ७ (अनिकेत गुप्ता २३, रोहन राऊत ४५, विवेक घलांड ४९, प्रसाद नाईक ५२, पियुष कुलकर्णी ५४, संकेत डोंगरे ५७, शंतनु खानापुरे ६०वे मिनिट)वि.वि. एफए सॅमफोर्ड १ (नेल्सन पास्टे ६१वे मिनिट)
गट जी – पुणे पायोनिर्स एफसी ३ (माका शेख ४९, ६२वे मिनिट, सार्थ कांबळे ५४वे मिनिट) वि.वि. ब्लॅकहॉक्स २ (यश भोईर ३२वे, प्रतिक शिंघे ४७वे मिनिट)
सिटी एफसी २ (दुर्वेश वाळके ८, १५, ४८वे मिनिट) बरोबरी वि. ईगल एफसी २ (जतिंदर चौहान २८, ४५, ६०+३रे मिनिट)
गट अ – परशुरामियन्स एससी ब २ (उझेर बारी ४३वे, सारंग दातारप ४८वे मिनिट) वि.वि. हायलॅंडर्स एफसी ०

एसएसपीएमएस मैदान – १६ वर्षांखालील
गट ब – क्रीडा प्रबोधिनी ९ (जॉय शेळके ४थे, साई पाटिल ९, १७, २७, ५५वे, राज पाटिल २८वे, अर्जुन दांडगे ४५वे, आयन शेख ५०वे, ५२वे मिनिट) वि.वि. सिटी एफसी पुणे १ (प्रथमेश सागर २४वे मिनिट)
गट अ – स्टेपओव्हर एफए ५ (जसवीर सिंग धिल्लॉं ९वे, रोहन कट्याळ ३०वे, ३०+१ले मिनिट, साहिल बेल्लारा ४०वे, रोहन उत्तेकर ४४वे मिनिट) वि.वि. बेटा स्पोर्टस क्लब ०
गेम ऑफ गोल एफसीसी ६ (वरद विनोद ७, ८, १२, सोहम चांदपुरे ३०, ४४, मल्हार दरेकर ३४वे मिनिट) वि.वि. जुन्नर तालुका २ (विरेंद्र कुटे १ले, ४०वे मिनिट)
गट सी लौकिक एफए ६ (सोहम सागर ५वे, अस्मय गायकवाड २६, ३०वे, आदित्य कांबळे ५४वे, सोहम नामजोशी ५७, ५९वे मिनिट) वि.वि. ४ लायन्स एफए ०
गट सी – यंग स्टेप्स एफए २ (कृणाल मोरे ३४वे, संतोष नांदवे ६०+३रे मिनिट) बरोबरी वि. पुणे पायोनिर्स २ (अथर्व खडतरे १६, ५४वे मिनिट)
गट अ – रायझिंग पुणे एफसी पुढे चाल वि. भोर एफसी

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

साई स्पोर्ट्स अन् बेटा संघांची संघर्षपूर्ण बाजी, रायझिंग पुणे एफसीचे १४ वर्षांखालील गटात सहज विजय

क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक

देहू फिटर्सला पूना सोशलने झुंजवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---