प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेला प्रो कबड्डीचा ११८ वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यात झाला. हा सामना ३१-३१ ने बरोबरीत सुटला.
WHAT A TIE! ????@PuneriPaltan and @GujaratGiants share the spoils in this #SuperhitPanga ????#GGvPUN #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/p77AdbzmDc
— ProKabaddi (@ProKabaddi) February 14, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा ११७ वा सामना दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. यूपी योद्धांनी ४४-२८ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे. तर ११६ वा सामना पटणा पायरेट्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पटणा पायरेट्सने ३८-३० च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील १४ वा विजय होता.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १९ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १४ सामने जिंकत ७५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६३ गुण), हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६० गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
यूपी योद्धांपुढे दबंग दिल्लीची शरणागती, ४४-२८च्या मोठ्या फरकाने सामना खिशात
‘टेबल टॉपर’ पटणा पायरेट्सचा आणखी एक विजय, तेलुगू टायटन्सला ३८-३० ने केले चितपट






