पुणे । प्रो कबड्डी लीगच्या ६व्या मोसमासाठी पुणेरी पलटणने आशन कुमार यांची प्रशिक्षक म्हणुन निवड केली आहे.
आशन कुमार एक महान माजी कबड्डीपटू असुन त्यांनी अनेक संघांना आजपर्यंत मार्गदर्शन केले आहे. खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द देखील गौरशाली राहिली आहे.
आशन कुमार भारतीय सेनादलचे माजी कबड्डी प्रशिक्षक होते व त्यांनी नाशिक आर्मी स्पोर्ट्स युनिटबरोबरदेखील काम केले आहे. त्यांनी नॅशनल इन्सिट्युट ऑफ स्पोर्ट्समधील कबड्डी प्रशिक्षणात ग्रेड ए डिप्लोमा मिळवला आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आशन कुमार यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बीजिंगमध्ये ११व्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धो आणि आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते.
६४व्या कबड्डी सीननयर राष्ट्रीय स्पर्धेत ते हरयाणा संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. या स्पर्धेत हरयाणा संघाने उपांत्य फेरी गाठली होती.
त्यांना १९९९ साली भारताच्या राष्ट्रपतींकडून अर्जून पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते तसेच हरयाणाचे राज्यपालांच्या हस्ते १९९४ मध्ये भीम पुरस्कार तर १९९३ मध्ये AKFI अध्यक्षांकडून भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
“या मोसमासाठी आमचा प्रयत्न आहे की आम्ही एक चांगली संघ बांधणी करु आणि त्यासाठी आम्ही एका चांगल्या प्रशिक्षकाच्या शोधात होतो. तसेच ज्या प्रशिक्षकांचा अनुभव जास्त आहे त्याची आम्हाला गरज होती. आशन कुमार यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. आता त्यांना प्रो-कबड्डीत पुणेरी पलटण संघाने ही जबाबदारी दिली आहे. अाम्हाला अपेक्षा आहे की त्याच्या अनुभवाचा फायदा होऊन आम्ही यावेळी विजेतेपद जिंकु.” असे या निवडीवर भाष्य करताना पुणेरी पलटण संघाचे सीईओ कैलास कांडपाल म्हणाले.
“पुणेरी पलटन हा एक चांगला संघ आहे. त्यांनी प्रत्येक मोसमात चांगली कामगिरी केली आहे. मला अपेक्षा आहे की या मोसमातही आम्ही चांगली कामगिरी करु” असे यावेळी नवनियुक्त प्रशिक्षक आशन कुमार म्हणाले.
संबंधित वृत्त-
–वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी स्पर्धेत मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात
–अजित पवार कबड्डीसाठी देणार या क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?
– पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनमधून राज्य संघटनेवर कोण तिघे जाणार?
–महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक २७ मे रोजी
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध