प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (23 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटणने जयपुर पिंक पँथर्सला 39-31 असे पराभूत करत आपले अव्वल स्थान मजबूत केले. तर, दुसऱ्या सामन्यात बेंगलोर बुल्स व बंगाल वॉरियर्स यांच्या दरम्यान अटीतटीची लढत झाली. यामध्ये अखेरीस बंगालने 41-38 असा विजय मिळवत प्ले ऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
They played like table toppers 👊
And we felt it watching on 🤩Kasa kaai Paltan, aata kasa vaat te?#vivoProKabaddi #FantasticPanga #JPPvPUN pic.twitter.com/y3EydB2yVE
— ProKabaddi (@ProKabaddi) November 23, 2022
हैदराबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणसमोर जयपुर पिंक पँथर्सने आव्हान उभे केले. यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पुणे संघाने आपला ताकदवान खेळ या सामन्यातही दाखवला. अर्जुन देशवाल याने जयपुरसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, पुणे संघाने सांघिक कामगिरी करत पहिल्य हाफमध्ये 20-16 अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या हाफमध्ये पुणे संघाने कोणतीही जोखीम न घेता आपला संयमी मात्र तितकाच दर्जेदार खेळ कायम राखला. अस्लम इनामदारने 9 तर मोहितने 7 गुण कमावले. जयपुरसाठी अर्जुन देशवालने एकट्याने झुंज देत 19 गुण मिळवले. फझल अत्राचली या विजयासह कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा खेळाडू ठरला. यापूर्वी त्याने पटना पायरेट्स व यु मुंबा यांचे नेतृत्व केले होते.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात बंगलोर बुल्स व बंगाल वॉरियर्स यांच्या दरम्यान चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. दुसऱ्या हाफमध्ये बेंगलोर संघ काहीसा आक्रमक दिसला. परंतु, अखेरच्या पाच मिनिटात बंगालने जबरदस्त पुनरागमन करत सामना 41-38 असा आपल्या नावे केला. बंगालसाठी मनिंदरने 10 तर गिरीश एर्नाकने 6 गुण कमावले. बेंगलोर साठी भरत हुंडाने पुन्हा एकदा सुपर टेन लगावत सर्वोच्च कामगिरी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय