प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १९ तारखेला प्रो कबड्डीचा १३० वा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यात झाला. पुणेरी पलटणने ३७-३० च्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
परंतु पुणेरी पलटणचा संघ विजयानंतरही प्लेऑफ फेरीमध्ये पोहोचू शकलेला नाही. मात्र या विजयासह त्यांचे गुण ६६ इतके झाले असून त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहे. त्यांच्या या विजयाचा फायदा बंगळुरू बुल्स संघाला झाला असून हा संघ प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे.
A Mo-HIT show by Aslam and co. take @PuneriPaltan closer to the Playoffs chance 😲
We are heading towards a thrilling finish 💯#PUNvJPP #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/xUoMUZpwoB
— ProKabaddi (@ProKabaddi) February 19, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २१ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८१ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ७५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. तसेच यूपी योद्धा (६८ गुण), बेंगलुरू बुल्स (६६ गुण) आणि पुणेरी पलटण (६६ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचा पाकिस्तान बोर्डावर धोखाधडीचा आरोप, अर्ध्यातूनच पीएसएलमधून घेतली माघार
INDvsSL: भविष्यासाठी ऍक्शन सुरू; पूर्वसूचना देत रहाणे, पुजारासह ४ सीनियर्सची कसोटी संघातून सुट्टी
‘त्याने माझं टेंशन कमी केले’, अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटचं कर्णधार रोहितकडून तोंडभरून कौतुक