कबड्डीमध्ये कालपासून इंटर झोनल सामने सुरु झाले. पहिला सामना पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. पुणेरी पलटणने पुन्हा विजयी मार्गावर आपला रथ मार्गस्त केला असून बेंगाल संघाला ३४-१७ असे दुपटीच्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला.
पुणेरी पलटण संघाने पहिल्या सामन्यात यु मुंबासारख्या तगड्या संघाला हरवले होते. या सामन्यात रेडींग आणि डिफेन्स दोन्ही आघाड्यांवर त्यांनी यु मुंबाला पाणी पाजले होते. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीचे आव्हान सहजरित्या परतवून लावले होते. तिसऱ्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सचा कर्णधार मंजीत चिल्लरच्या झुंजार खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा सामना त्यांना गमवावा लागला. २८-३० असा दोन गुणांच्या फरकाने जयपुरने विजय मिळवला.
बेंगालचा संघ सर्व पातळयांवर कमकुवत जाणवला आणि त्यांची मोठी नावं म्हणजेच जांग कुंन ली, सुरजीत सिंग, काही खास कमाल करू शकले नाहीत आणि संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
या इंटर झोन वीकला चांगली सुरवात पुण्याने करून दिली असे म्हणायला हरकत नाही.