पुणे | प्रो-कबड्डीमधील दिग्गज टीम पुणेरी पलटण ४ मार्च रोजी “बोल कबड्डी”चे अनावरण फिनीक्स मार्केट सिटी येथे करणार आहे.
भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज महिला कबड्डीपटू दीपिका जोसेफ यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा १७ वर्षाखालील मुलींसाठी खास आयोजीत केली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ह्या स्पर्धेचे खास आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार असून त्यासाठी बुट अनिवार्य आहे.
यावेळी बोल कबड्डीचे अनावरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेची माहिती:
तारीख: रविवार, ४ मार्च २०१८
स्थळ: फिनीक्स मार्केट सिटी, पुणे
नोंदणीसाठी संपर्क: +९१ ९१३०९२०५५३
Mark your calendars #Paltan. It's time to celebrate the future women who will take #Kabaddi to even greater heights. #BolKabaddi #InterSchoolKabaddiTournament #KabaddiTournament #AllGirlsKabaddi #GirlPower pic.twitter.com/nCIHu75xeL
— Puneri Paltan (@PuneriPaltan) February 22, 2018