---Advertisement---

पुणेरी पलटणच्या पदरी दुसरा पराभव; पटना पायरेट्सने एकतर्फी सामन्यात लोळवले

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 8:28 PM
puneri-patna
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या सातव्या दिवशी पुणेरी पलटण व पटना पायरेट्स आमने-सामने आले. स्टार खेळाडूंनी सुसज्ज असे हे दोन्ही संघ सामन्यात आक्रमक खेळ करताना दिसले. अखेरीस पटनाने ३८-२६ अशा फरकाने हा सामना आपल्या नावे केला.

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पुणे संघासाठी युवा रेडर पंकज मोहिते याने सातत्याने गुण मिळविले. दुसरीकडे पटना संघ बचावावर भर देताना दिसला. मध्यंतराला सामना १४-१४ असा बरोबरीत होता.

दुसऱ्या हाफमध्ये काहीसा वेगवान खेळ पाहायला मिळाला. ऑल आऊट झाल्यानंतर पुणे संघाने अत्यंत वेगवान खेळ केला. मात्र, सचिन तंवर व प्रशांत राय या अनुभवी जोडीने पटनासाठी गुण घेणे सुरूच ठेवले. त्यांनी दुसऱ्या हाफमध्ये पुणे संघाला दोनदा ऑल आऊट केले. पटना संघासाठी ईराणी कॉर्नर रेझा याने मन जिंकणारी कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---